स्नेहसंमेलन म्हणजे विविध कलागुणांना संधी व वाव... डॉ.किशोर केला.सहकार विद्या मंदिर व स्व. नारायणी देवी साह कनिष्ठ महाविद्यालय दानापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
तेल्हारा तालुका प्रतिनिधी...
दानापूर येथील सहकार विद्या मंदिर व स्व.नारायणी देवी साह कनिष्ठ महाविद्यालया मध्ये विद्यार्थी हा तणावमुक्त व सर्वांगीण प्रगती करत शिकणारा आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना संधी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिक्षण दिले जात असल्याचे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष डॉ. किशोर केला यांनी दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन - ग्लिटरिंग स्टार २०२५ प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. किशोर केला हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे आधारस्तंभ किसनलालजी केला हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्य संयोजिका व महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद जळगाव जामोद केंद्राच्या अध्यक्षा डॉ.सौ. स्वाती केला, हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड, स्थानिक संचालक भोजराजजी पालीवाल, डॉ.वासुदेवराव शर्मा, राधेश्यामजी साह, सरपंच सौ.सपनाताई वाकोडे, जि. प. सदस्य गजानन काकड, संदीप पालीवाल, पो.पा. संतोष माकोडे , बुलडाणा अर्बन हिवरखेड येथील शाखा व्यवस्थापक रामदासजी भालेराव हे होते. यावेळी कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सहकार विद्या मंदिर वरवट बकाल च्या पर्यवेक्षिका सौ.पल्लवी मानकर, व जळगांव जामोदच्या शिक्षिका सौ. वर्षा वंडाळे ह्या होत्या. मंचावर प्राचार्य रवींद्र घायल, प्राचार्य विनायक उमाळे(जळगांव जामोद), प्राचार्य विनोद ईश्वरे(जळगांव जामोद) ,प्राचार्य योगेश घाटोळे(वरवट बकाल) ,प्राचार्य प्रकाश भुते(वरवट बकाल) ,प्राचार्य राजेश लोहिया(वरवट बकाल), उपप्राचार्य कोकाटे (वरवट बकाल), पर्यवेक्षिका चंचल गांधी, सुनीता कोरडे, अरुणा व्यवहारे(जळगांव जामोद) हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते स्व. बिहारीललाजी साह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे आगमन शाळेतील ४ थीच्या मुलींच्या लेझीम पथकाच्या तालात मंचावर झाले. बुद्धीची देवता श्री गणपती व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ.. स्वाती केला यांनी विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये सुसंस्कृतपणा व काटेकोरपणा निर्माण करावा, स्वतःची सर्वांगीण प्रगती करावी यासाठी सतत घेण्यात येत असलेल्या शाळेत विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये चिमुकल्यांनी आपल्या विविध कलाकृतीतून सामाजिक व एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी देवाधिकांचे नमन, आई वडिलांचे प्रेम, शिक्षकांचे महत्त्व, शेतकऱ्यांचे महत्व, पाण्याचे व पाणी वाचवण्याचे महत्व, देशाभिमान जागृत करणारे तसेच आदिवासी नृत्य अशी अनेक बहारदार नृत्ये सादर केली. तसेच एकलनृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा व कविता वाचन स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक रवींद्र इंगळे सर व आभार प्रदर्शन शिक्षक अशोक चोबे सर यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दानापुर,जळगाव जामोद व वरवट बकाल येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
