![]() |
सोन्याच्या गिंन्या दाखवून दोन लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी जळगाव जा पोलीस स्टेशन ल गुहा दाखल,!!जामोद येथील घटना..!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नकली सोने, काळी हळद, पांढरे बिबे ,मांडूळ साप,सचं बोलो सच तोलो कलदर,नागमनी, भोपळे व इतर वस्तूची कमी पैशात मिळत असल्याची दलाला कडून बतावणी करून बाहेर जिल्ह्यातील लोकांची मोठी फसवणूक करून मारहाण करत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार कित्तेक वर्षापासून पासून परिसरात सुरू आहे परिसरात व जळगाव जा संग्रामपूर तालुक्यात मोठे रॅकेट सक्रिय असून मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय असून यांच्या विरोधात कारवाई झाली नव्हती परंतु राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटने चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदिर यांच्या पुढाकाराने प्रकरणी जळगाव जा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला,यामध्ये खाकी वर्दीचे काही दलालांसोबत हित संबंध असल्याचे परिसरात चर्चिले जात आहे प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांचेशी गंभीर प्रकरणी कारवाईची मागणी शेख सईद शेख कदिर मागणी करणार असल्याचे त्यांनी प्रसार मध्यांशी बोलताना सांगितले!दिनाक १८ फेब्रुवारी रोजी जामोद चौकी चे हद्दीतील घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे दोघांना सोन्याच्या गींन्या कमी पैशात मिळत असल्याची ची बतावणी करून दोन लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जा तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली नुकतीच घडली असून घटनेची फिर्याद सुनील चंद्रभान तायडे राहणार बोरगाव वैराळे तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांनी दिनाक १९ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे प्रथक्ष येऊन लेखी फिर्याद दिली.घटना ,दिनाक १८ फेब्रुवारी रोजी जामोद येथील आरोपी भारत भोसले व इतर दोन अशा तीन आरोपींनी फिर्यादी यांना कमी किंमतीत सोन्याच्या गिंण्या देतो असे सांगून सोन्याच्या गिंण्या घेण्यासाठी जामोद येथून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या मालठाणा येथे आरोपीचे साथीदार पैकी एक महिलेने घरातील पिवळ्या रंगाचे सोन्यासारख्या दिसणाऱ्या गिन्न्या फिर्यादी व फिर्यदीचा मित्र यांना दाखवल्या सोन्याची किंमत ठरवून दोन लाख रुपये नगदी देण्याचे अटीवर प्रथम पैसे द्या नंतर सोने देतो असे सांगून फिर्यादी ने दोन लाख रुपये सोन्याच्या गिन्न्या चे बदल्यात आरोपींना पैसे दिले सोन्याच्या गिन्न्या मगीतल्या असता जामोद येथून दीड किलोमिटर अंतरावर मंदिराचे विहीरिजवळ येऊन तिन्ही आरोपीनी पैसे घेऊन पडून गेले येथील उपस्थितांनी फिर्यादी व त्यांचा मित्राला मारहाण करत खिस्यातिल नगदी पैसे व दोन मोबाईल फोन सह नगदी दोन लाख रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी भारत भोसले व इतर दोन सर्व राहणार जामोद मालठाना यांचे विरुद्ध अप,क्रमांक 96/25 नुसार कलम 318,(4) 3 (5) बी,एन,एस अन्वये तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास जळगाव जा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गद्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करीत आहेत, सोन्याच्या गिंण्या फसवणूक प्रकरणांमध्ये जामोद बीटच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची गावामध्ये जोरात चर्चा सुरू असून सक्रिय रॅकेटचे भांडाफोड करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. याप्रकरणी जळगाव जामोद ठाणेदार कोणती कारवाई करतात या कारवाईकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे..
