जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील पी.एम. श्री. जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे वादन स्पर्धेत यश संपादन करत आपल्या शाळेचे नाव लोकीत करत शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक पिंपळगाव काळे नगरीमध्ये व सर्वत्र होत आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या हेतूने बुलढाणा जिल्ह्याचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या इच्छेतून दिनांक ३/२/२०२५ रोजी शाळा, केंद्र, तालुकास्तरावरून क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय व्यंगचित्र, हस्ताक्षर, गायन, वादन, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.बुलढाणा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये पी.एम.श्री. जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.यापैकी व्यंगचित्र स्पर्धेमध्ये नम्रता भगत वर्ग ९ च्या विद्यार्थिनींने हस्ताक्षर स्पर्धेमध्ये व विष्णू पारस्कार वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांने यांनी सहभाग नोंदविला तर ओम उगले वर्ग ९ विच्या विद्यार्थ्यांने उत्कृष्ट पखावज वादन करून प्रेक्षकांची दाद मिळवली तसेच जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.व सदर वादन स्पर्धेसाठी जी.टी. चव्हाण तथा शाळेचे मुख्याध्यापक एम.डी.हेंडवे यांचे मार्गदर्शन होते.
पिंपळगाव काळे जि.प. हायस्कूल विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय वादन स्पर्धेत घवघवीत यश..
मंगल काकडे/पिंपळगाव काळे...
