शिधापत्रिकाधारकांनी 31मार्च पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक...पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे !


 
शिधापत्रिकाधारकांनी 31मार्च पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक...पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे ! 

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर तालुक्यातील शिधापत्रक धारकांना येणाऱ्या 31 मार्च पर्यंत ई केवायसी करावी, अन्यथा शिधापत्रक रद्द होणार असुन, शिधा पत्रकधारक स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यासाठी केवायसी न झालेले 30 हजार लाभार्थ्यांनी 31 मार्च पर्यन्त केवायसी करणे बंधकारक आहे. असे आवाहन संग्रामपूर पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांनी केले आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत गरीब गरजूंना अत्यन्त कमी दरात रेशनधारकांचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता ई केवायसी करण्याची अट घातली आहे.योजनेतील बनावट लाभार्थ्यांना शोध ई केवायसीतुन लागणार आहे.ही प्रकिया पूर्ण करण्यासाठी 31मार्च पर्यन्त मुदत देण्यात आली असून ई केवायसी न केलेल्यांचे रेशन धान्य बंद होणार असल्याची माहिती आहे.

 संग्रामपूर तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार स्वतः घरोघरी जाऊन केवायसी करत असून 74 टक्के केवायसी झाली असून 25 टक्के म्हणजेच 31 हजार शिधापत्रकधारकांची केवायसी बाकी आहे.पुरवठा विभाग त्यावर काम करीत आहे. संग्रामपूर तालुक्यातील 74 टक्के लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे. उर्वरित 25 टक्के लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार संग्रामपूर तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मोहीम हाती घेऊन लाभार्थ्यांची ई केवायसी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत. ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ दिली होती. आता ३१मार्च २०२५ ही अंतिम मुदत राज्य सरकारने दिली आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाने 'मेरा ई केवायसी' हे मोबाईल ऍप विकसित केले आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी गुगल पे स्टोअर वरून मेरा ई केवायसी व आधार फेस आर डी अँप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. त्यामुळे मोबाईलवरून घरबसल्या स्वतः आणि कुटुंबातील इतर व्यक्तींची ई केवायसी पूर्ण करता येणार आहे, असे पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांनी म्हटले आहे.संग्रामपूर तालुक्यातील अन्नधान्य घेणाऱ्या सवलत रेशन कार्डधारकांनी शिधापत्रिकेत नावे असणाऱ्या आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी आपले विभागा अंतर्गत असणाऱ्या दुकानात जावून तेथे उपलब्ध दिलेल्या ईपॉस डिजिटल यंत्रणामध्ये सर्वांचे आधार क्रमांक दाखल करावा. काही वेळातच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. स्थलांतरित कुटुंबातील देखील कुटुंबाने आपले रेशन दुकानात जावून ई केवायसी करावी ,त्यामध्ये रेशन धान्य दुकानातून धान्य वाटप होणाऱ्या रेशन देण्याची खरी पडताळणी होईल, व स्वस्त धान्य दुकानदारांना वेगळ्या मार्गाने धान्य विकता येणार नाही.हा मूळ उद्देश या योजनेचा आहे. तरी सर्व रेशन कार्डधारकांनी त्वरित केवायसी करावी. असे आवाहन पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांनी केले आहे.

Previous Post Next Post