संयमाचा बांध आणि आक्रमकतेची दाहकता..अखेर यशस्वी ठरली.धमक्यांचे सत्र:अभिनंदनचा वर्षावही आझाद हिंदने अनुभवला. अवैध्य धंदे आणि आंदोलनाची जागा निश्चिती सह मागण्यांची पूर्तता.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
22 मार्चपासून बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार प्रांगणात सहिष्णू संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आझाद हिंदच्या आमरण उपोषणाला जिल्हा प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे 26 मार्चला सकाळी आक्रमक आंदोलनाचे स्वरूप आले. आझाद हिंद महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांच्या संयमाचा बांध फुटला. जिल्हा प्रशासनाला काळे झेंडे दाखवीत रास्ता रोकोचा इशारा 25 मार्चला देण्यात आला. तरीसुद्धा असंवेदनशील जिल्हा प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच 26 मार्चला सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची गाडी उपोषण मंडपा जवळून जात असताना आझाद हिंद कार्यकर्त्यांकडून थांबविण्यात आली.काळा झेंड्याद्वारे निषेध नोंदवित पोलीस अधीक्षकांना जाब विचारला. पोलिसांनी आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेले जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या. बघता बघता काही मिनिटातच पोलिसांचा मोठा फौज फाटा आंदोलन स्थळी पोहोचला. जिल्हा प्रशासनासोबत आझाद हिंद च्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू झाली. दोन तासात सहा मागण्यांचे आदेश त्वरित पारित झाले. अवैद्य धंदेही बंद झाले.
_________________________________________
शेतकरी शेनफळराव घुगे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वी सांगता.
ज्येष्ठ शेतकरी शेनफळराव घुबे पाटील, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील,गृह विभागाचे अधीक्षक विजय पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक भुसारी, आरटीओ महाजन, नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश पांडे, उपमुख्य अधिकारी सावळे,अधीक्षक सुनील बेंडवाल, जिल्हा परिषद प्लास्टिक कचरा निर्मूलनाचे शेंडगे,पोलीस प्रशासनाचे सुनील दळवी, डुकरे पाटील, दशरथ सोनुने, आझाद हिंदच्या सुरेखाताई निकाळजे, प्रमिलाबाई सुशीर, निर्मलाताई रोठे, अन्नपूर्णाबाई चाफेकर, आशाताई गायकवाड, यशोदाताई खंडारे, सिंधुताई अहेर, शोभाताई भंडारे,आदींच्या प्रमुख उपस्थितीत नारळ पाणी, लस्सी घेऊन 26 मार्चला सायंकाळी आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.
_______________________________________
अवैद्य धंद्यांसह सर्व मागण्यांची पूर्तता.
जिल्ह्यातील अवैद्य धंदे, रेती तस्करी, अनधिकृत वाहतूक बंद करावी, गहाळ मुलींचा शोध लावावा, शहरात महिलांसाठी मोफत प्रसाधन गृह,स्वच्छतागृह बांधावे, आमरण उपोषणाची जागा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील नागरी ज्वलंत मागण्यांची पूर्तता झाली.
_______________________________________
गावगुंड आणि प्रशासनाकडून धमक्यांचे सत्र.
आंदोलनादरम्यान अवध्य व्यवसाय गाव गुंडांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून खंडणी, खुनाचे गुन्हे दाखल करू, जीवाने मारून टाकू, महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. दिवसा आंदोलकांना पोलिसांची सुरक्षा परंतु रात्री नाही. महिला आंदोलकांना प्रसाधन गृह दिले परंतु पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे कुचंबना झाली. तरी आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांनी धमक्यांना भीक घातली नाही.परिस्थितीवर मात करत आंदोलन यशस्वी करून दाखवले. त्यामुळे जिल्हाभरातून आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे..
