विकासाच्या व्हिजन मधून मतदार संघ अव्वल बनविणार-आ.डॉ.संजय कुटे...अभिष्टचिंतन सोहळ्याला जनतेची भावनिक किनार..


 
विकासाच्या व्हिजन मधून मतदार संघ अव्वल बनविणार-आ.डॉ.संजय कुटे...अभिष्टचिंतन सोहळ्याला जनतेची भावनिक किनार..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

विकासाच्या व्हिजन मधून मतदार संघ अव्वल बनविणार असून निवडणुकीतील वचननाम्यातील पूर्तता हेच माझे ध्येय आहे असे प्रतिपादन जळगांव जा.मतदार संघांचे लाडके आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले.9 मार्च रोजी आयोजित शेगाव येथील देशमुख मंगल कार्यालयातील अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी 2029 पर्यंत मतदार संघात समस्या राहणार नाही असेही सांगितले. या कार्यक्रमाला मतदार संघातील भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 9 मार्च निमित्य शहरात सकाळपासूनच रेलचेल होती. संध्याकाळी डॉ.कुटे यांचे आगमणावेळी प्रचंड फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्यावर आधारित सुमधुर गाण्यांचा आर्केष्ट्रा ठेवण्यात आला होता. मंगलकार्यालयाच्या दरवाज्यावर त्यांची पपई फळ तुला करण्यात आली त्यानंतर स्टेजवर जाऊन डॉ. कुटे यांनी पत्नी डॉ.सौ.अपर्णा कुटे, बंधू राजू कुटे, प्रमोद कुटे, मुलगा अभिषेक कुटे असा सहपरिवार शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, युवा शहराध्यक्ष सचिन ढमाल यांच्या उपस्थितीत केक कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी यांनी डॉ.कुटे यांचे भावनिक होऊन पुष्पगुछ, शाल श्रीफळ देत सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल, पुरुषोत्तम शेगोकार, शकुंतलाताई बूच, विजयबाप्पू देशमुख, संजय कलोरे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वरआप्पा साखरे, दिपक ढमाळ, प्रदेश कार्यकरणी सदस्य प्रदीप सांगळे,जिल्हा सदस्य राजेश अग्रवाल, युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिन ढमाळ, पांडुरंग बूच, जितुसेठ सूळ, प्रमोद सूळ, पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, गजानन जवंजाळ, न.प.उपाध्यक्ष वर्षा ढमाळ, ज्योती कचरे, सुषमा शेगोकार, मुन्ना कचरे, नितीन शेगोकार, नगरसेवक राजू कलोरे, विजय यादव, सरपंच रामा पाटील थारकर, डॉ. मोहन बानोले, पै.विजय बूच, का.जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया अमित जाधव, ऍड.पोकळे, डॉ. राजेश सराफ, विनोद साळुंके, युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश पाखरे, सोनू मोहोड,अनिल उंबरकर, अंजली जोशी, दिपक शर्मा, बाळू घोराळे, रजनीताई पहूरकर,अनु. जातीजमाती सेल अध्यक्ष राजू सुरवाडे, नगरसेविका रत्नमाला ठवे, गोपाळ पाटील, गजानन नाईकवाडे, भैया सूळ, अमोल कांबळे, पंकज गिते, गणेश शेम्बडे, गणेश ठोंबरे, लोकेश तायडे, विजय विभुते, संतोष लिप्ते कमलाकर चव्हाण, राजेंद्र शेगोकार यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

-----------------------

शेतकऱ्याने केली आ.डॉ.कुटेंची स्वतः पीकविलेल्या 'पपई फळ तुला'

अभिष्टचिंतन सोहळ्यात भाजपा कार्यकर्ते शेतकरी प्रमोद काठोळे यांनी त्यांच्या 60 एक्कर शेतात सेंद्रिय पद्धतीने पीकविलेल्या 'पपई फळाने' आ.डॉ.संजय कुटे यांची तुला केली. त्यानंतर हे फळे सर्व उपस्थितांना कापून थंड बर्फीसोबत वाटून दिले. यावेळी शेतकरी कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून डॉ.कुटे हे भावनिक झाले होते. तर अभिष्टचिंतन सोहळ्यात ह्या शेतकऱ्याच्या नेता प्रेमाबद्दल कौतुक होत होते.

Previous Post Next Post