नगर परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठी उच्च प्राथमिक शाळा क्र ३ च्या वर्ग खोल्या डिजिटल...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
छत्रपती शिवाजी महाराज न.प.मराठी उच्च प्राथ.शाळा क्र. ३ जळगाव जा.येथे दि. ६ मार्च २०२५ ला डिजीटल वर्गखोल्यांचा उद्घाटन सोहळा न. प. जळगावचे मुख्याधिकारी डॉ सुरज जाधव, यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी संदिप मोरे गटशिक्षणाधिकारी वामनराव फंड, एच. डी. एफ. सी. बँक शाखा व्यवस्थापक विनोद घोंगे व प्रशासन अधिकारी वहिदखान नगर परिषदेचे शहर समन्वयक श्री वैभव क्षीरसागर शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष शे. चांद,वरिष्ठ शिक्षण लिपिक गजानन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोत्साह पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात येथील शाळेच्या विद्यार्थीनींच्या सुरेल अशा स्वागत गीताने करण्यात आली.सुरुवातीला डिजीटल वर्ग खोल्यांचे उद्घाटन डॉ.सुरज जाधव मुख्याधिकारी न. प. जळगाव, गटविकास अधिकारी संदिप मोरे, गटशिक्षणाधिकारी वामन फंड, एच. डी. एफ. सी बँक शाखा व्यवस्थापक विनोद घोंगे. शाळेचे मुख्याध्यापक ठेंग सर आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विशेष उल्लेखनिय म्हणजे या शाळेतील चिमण्या मुलांनी स्वतः डिजिटल बोर्डवरुन आपली ईवलीशी बोटे फिरवून नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा परिचय करुन दिला.न. प. ने चार कोटी खर्च करुन या सर्व सोयींनी युक्त अशी शाळेसाठी सुसज्ज ईमारत उभारुन दिली. सोबतच यामध्ये पन्नास लक्ष फर्निचर, पंन्नास लक्ष, ई-लर्निंग साहित्य, चाळीस लक्ष सोलर युनिट व दहा लक्ष रुपयांचे सीसी टी. व्ही कॅमेरे सुद्धा बसविलेले आहेत.या विभागाचे कार्यसम्राट आमदार संजयभाऊ कुटे या शाळेकडे अगदी सुक्ष्मपणे लक्ष देऊन अडीअडचणी समजून घेऊन समस्यांचे वेळोवेळी निराकरण करीत असतात. डॉ. सुरज जाधव यांच्या कल्पनेतून तालुक्यात प्रशिक्षण शाळा इमारत नसल्यामुळे वातानुकुलीत नगर परिषद तालुका प्रशिक्षण निवासी संस्था जळगाव जामोद येथे सर्व सोयींनीयुक्त अशी प्रशिक्षण संस्था व्हावी म्हणून नगर परिषदेच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मा आमदार डॉ. संजयजी कुटे साहेब प्रस्तावास मंजुरी करिता तसेच निधीची कमतरता पडू देणार नाही. हे सर्वांनाच ज्ञात आहे.या शाळेतील शिक्षक वर्ग उच्च विद्या विभुषीत असून उल्लेखनिय असे दर्जेदार अध्यापण करीत असतात मुख्याध्याप ठेंग सरांचे उत्कृष्ट प्रशासन शाळेच्या वैभवाची साक्ष देते.या शाळेचा दरवर्षीचा परीक्षेचा निकाल सुद्धा उल्लेखनिय असतो हे मात्र विशेष आहे.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनिता कौलकर , वर्षा दाभाडे, अरुण वानखेडे, कीर्ती सातव, कविता कुमावत , विठ्ठल इंगळे , सचिन धांडे, संजय सोळंके, आश्विन आंधळे , शंकर तायडे यांनी परिश्रम घेतले.तर सूत्र संचालन विठ्ठल इंगळे सर तर आभार प्रकट दिपक पसरटे सर यांनी केले.
