जळगाव जामोद येथे मंडळ स्तरीय महसूल अदालत संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्य शासनाने सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता ७ कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे या कार्यक्रमांतर्गत प्रशासनास येत्या १०० दिवसात प्राधान्याने करावयाच्या कारवाईबाबत जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील बुलढाणा यांनी दिलेल्या निर्देशानुसार जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार पवन पाटील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० मार्च रोजी जळगाव जामोद शहरातील सांस्कृतिक भवन येथे महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.महसुली अदालत मध्ये भारत किटे नायब तहसीलदार यांनी अग्रीस्ट्रेक ,पादण रस्ते, जिवंत सातबारा, पुरवठा विभाग, मतदार यादी अद्यावतीकरण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.नायब तहसीलदार संजय मारकंड व नायब तहसीलदार मयुरेश भुजबळ यांनी सुद्धा उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजर राहून आपले विविध दाखले घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला.पी. एम.किसान चे ७२ प्रकरणे, संजय गांधी १९८ वारस प्रकरण,१३ ॲग्रीस्टेक,२३ आधार प्रमाणीकरण,१९रेशन कार्ड ची १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली.मंडळ अधिकारी सुरेश राठोड, जळगाव मंडळ ग्राम महसूल अधिकारी एस एम देशमुख, विशाल शिंदे, सागर त्रिभुवन, गोपाल कोरडे, कु आरती नारे आणि मंडळातील महसूल सेवक गुणवंत जाधव, सखाराम डावर, एम एस चोपडे व प्रवीण राठोड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
