श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...आ.डॉ.संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने १०० रुग्णाच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर....


 
श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...आ.डॉ.संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने १०० रुग्णाच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर....

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने 9 मार्च रोजी श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते... जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून सन 2021 पासून आज पर्यंत जवळपास दोन हजारापेक्षा जास्त मोतीबिंदू रुग्णांची मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत... श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन च्या पुढाकाराने अनेक सामाजिक उपक्रमासोबत जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील नेत्र व मोतीबिंदू रुग्णांसाठी तपासणी पासून ते शस्त्रक्रिये पर्यंत उपचार पूर्ण केले जातात याकरिता जाण्या येण्याच्या प्रवासासह बुलढाणा अर्बन च्या माध्यमातून सर्व सुविधा पुरविल्या जातात.... दरम्यान नऊ मार्चला आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने या मोतीबिंदू रुग्णांना शेगाव येथील सईबाई मोटे जिल्हा उपसामान्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यासाठी सहकार विद्या मंदिर च्या चार बसेस ची व्यवस्था करण्यात आली होती... यावेळी सर्वप्रथम आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले... त्यानंतर मोतीबिंदू रुग्णांना अल्पोपहार देऊन शस्त्रक्रिये करिता शेगाव ला पाठवण्यात आले....याप्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे, सौ.अपर्णाताई कुटे, आमदार कुटे यांच्या मातोश्री, राजू भाऊ कुटे डॉक्टर किशोर केला, आमदारांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर नंदकिशोर तायडे,चांगेफळ संन्यास आश्रमाचे राम भारती महाराज, रवी पाचपोर, पांडूभाऊ इंगळे, प्राचार्य विनायक उमाळे, बुलढाणा अर्बन चे शाखा व्यवस्थापक संतोष केला, योगेश जोशी, भूपेंद्र अवचार, गणेश उगले, राजू हिस्सल, राजेश राठी, गजानन खरात तसेच निलेश शेळके व अतुल उदार रमेश मुझलदा सुलताने संतोष कापसे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रामुख्याने उपस्थित होते...

Previous Post Next Post