अपघातातील गंभीर जखमीस केली होती मदत.. उपचार घेऊन आल्यानंतर मानले सय्यद नफीस यांचे आभार. तर उपस्थितांनीही केले सय्यद नफीस यांचे कौतुक..
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद बऱ्हाणपूर रोडवर काही दिवसा अगोदर गहिरे सर यांचा गंभीररीत्या अपघात झाला होता. रस्त्याने जात असताना समाजवादी पक्षाचे नवनियुक्त बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी अपघातात गंभीररित्या जखमी अवस्थेतील गहिरे सर यांना आपल्या गाडीने उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पोहोचविले होते. गहिरे सर गंभीरित्या जखमी असल्याने त्यांच्यावर तीन महिने उपचार सुरू होते. तीन महिन्यानंतर सुखरूप परतल्याने गहिरे सर यांनी गेल्या आठ दिवसापासून सय्यद नफीस यांना फोन करून घरी बोलावून घेतले होते. मरणाच्या दारातून गहिरे सर परत आल्याने व त्यांना तात्काळ उपचार मिळवून दिल्याबद्दल गहिरे सर यांच्या परिवारातील सदस्यांनी समाजवादी पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज यांचे आभार मानले. गहिरे सर हे गंभीरता जखमी झाल्याने कोमामध्ये गेले होते. सय्यद नफीस यांनी घेतलेल्या पुढाकाराने गहिरे सर यांना पुन्हा नव्याने जीवन मिळाले या ऋणा बद्दल सय्यद नफीस यांना गहिरे सरांनी घरी आल्यानंतर आठ दिवसापासून आपल्या भेटीसाठी दूरध्वनीवरून संपर्क करून भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. सय्यद नफीस यांनी गहिरे सर यांच्या विनंतीस मान देत त्यांच्या घरी गेले यावेळी गहिरे सर यांना गहिवरून आले होते.. यावेळी त्यांच्या तोंडून शब्द निघाले भाऊ तुम्ही होता म्हणून आज मी जिवंत आहे तुमचे उपकार मी मरेपर्यंत कधीही विसरणार नाही.. तुम्ही भविष्यात खूप मोठे व्हाल अशी देवासमोर प्रार्थना केली. तसेच यावेळी गहिरे सर व सय्यद नफीस यांनी गळाभेट घेऊन हिंदू मुस्लिम एकतेची एक मिसाल हा आदर्श सर्वांसमोर ठेवला... यावेळी गहिरे सरांच्या तोंडून निघाले ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा तसेच सय्यद नफीस यांच्यासोबत चहा व फराळ घेऊन गहिरे सरांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देत सय्यद नफीज यांनी गहिरे सरांचा निरोप घेतला. त्यावेळी गहिरे सरांच्या कुटुंबीयांसह उपस्थित असलेल्या नागरिकांना सय्यद नफीस यांनी केलेल्या कार्याबद्दल सय्यद नफीस यांच्या आभार व्यक्त करत ते करीत असलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या..हे विशेष.
