जळगाव शहरात समाजरत्न कांशीराम जयंती उत्सव साजरा ..बस्ती गाव चलो अभियानाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न ..


 
जळगाव शहरात समाजरत्न कांशीराम जयंती उत्सव साजरा ..बस्ती गाव चलो अभियानाचा समारोपिय कार्यक्रम संपन्न ..

जळगाव जामोद प्रतिनिधी...

गुरु रविदास सत्यशोधक समाज व रविदास सत्यशोधक मासिक जिल्हा बुलढाणाच्या वतीने भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बस्ती (गाव) चलो अभियाना दिनांक 12 फेब्रुवारी 2025 ते 15 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात आले होते ..बस्ती गाव चलो अभियान समारोप तसेच बहुजन समाजरत्न कांशीरामजीं यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 15 मार्च शनिवार रोजी स्थानिक जळगांव जामोद येथील गुरु रविदास जयंती उत्सव स्थळ , रामदेव नगर येथे जाहीर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते...कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते .ग मा पिंजरकर प्रदेश महासचिव गुरूरविदास सत्यशोधक समाज , कार्यक्रमाच्या उद्घाटिका रेखाताई गजानन दांडगे सामाजिक कार्यकर्त्या ,मुख्य अतिथी भ. सु. खरात प्रदेश सचिव गुरु रविदास सत्यशोधक समाज प्रभारी बुलढाणा जिल्हा, प्रमुख पाहुणे - बलराज सावळे, प्रदेश सचिव गुरु रविदास सत्यशोधक समाज प्रभारी अकोला ,रामचंद्र ढबाले,सामाजिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कांशीरामजी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन करण्यात आले ..कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र शेगोकार जिल्हा संयोजक गुरू रविदास सत्यशोधक समाज, जिल्हा बुलडाणा यांनी केले....प्रास्ताविकामध्ये रविंद्र शेगोकार यांनी गावं चलो अभियाना अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात विशेष करून जळगांव जामोद, संग्रामपूर व नांदुरा तालुक्यात घेण्यात आलेल्या समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांविषयीची माहिती दिली..... तसेच कांशीरामजी यांचे कार्य,संघर्ष व चळवळ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशासाठी पोहचवावी याचे महत्त्व विषद करण्यात आले....रामचंद्र ढबाले ,ज्ञानदेवराव इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.... याशिवाय प्रकाश डाखोडे , मुकुंदराव भटकर,देविदास गोरे, गजानन तांदळे ,सविता रविंद्र शेगोकार,रुख्मिणीताई रविंद्र काकडे,.वर्षा ज्ञानदेवराव इंगळे, .नीता विजय तांदळे, .जयश्री कृष्णा भगत, रुक्मिणी विठ्ठलराव सावळे,वंदना भटकर, सीमा राजू वाढे,राधा गव्हाळे,उषा काकडे इतर समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेवराव थोटे तर आभार प्रदर्शन संदीप इंगळे यांनी केले..

Previous Post Next Post