पाणी बचत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.. घेतली पाणी बचतीसाठी शपथ...


 
पाणी बचत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.. घेतली पाणी बचतीसाठी शपथ...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. सलीम पटेल साहेब, सहसचिव रब्बानी देशमुख, उपाध्यक्ष प्रा. कय्युम पटेल, संचालक सिराजोद्दीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ मार्च रोजी बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने व कार्यकारी अभियंता, जिगाव पुनर्वसन विभाग, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "पाणी बचत जनजागृती कार्यक्रम" मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. जल जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व महाविद्यालयीन कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. शेख फराह होत्या तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद इंगळे, कनिष्ठ अभियंता सलीम अ. फकीर, संदीप एकंडवार, स्नेहल शिवदास वाकोडे, उदय उपाध्ये, तुषार रामेकर, राजेश वारे व अनंता बरगट यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कनिष्ठ अभियंता सलीम फकीर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून पाणी बचतीचे महत्त्व स्पष्ट केले. कनिष्ठ अभियंता संदीप एकंडवार यांनी वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, हवामान बदल आणि अवाजवी पाणी वापर यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, डॉ. शेख फराह यांनी अध्यक्षीय भाषणात पाण्याच्या शाश्वत वापरासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने व जाणीवपूर्वक पाणी वाचवावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात पाणी वाचविण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवणे, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर करणे, घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्रात पाण्याचा काटकसरीने वापर करणे, झाडे लावणे आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टींवर भर देण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी व रासेयो स्वयंसेवकांनी "पाणी बचतीची शपथ" घेतली. या शपथेत प्रत्येकाने स्वतः पाणी वाचविण्याचा संकल्प केला तसेच समाजातही जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचे वचन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर जांभळे यांनी तर प्रा. मुकुंद इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीची जाणीव निर्माण झाली आणि त्यांनी भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून जलसंवर्धनासाठी योगदान देण्याचा निर्धार केला.

Previous Post Next Post