जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत २० लाख रूपये किंमतीचा गुटका पकडला एक आरोपी अटकेत...


 
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत २० लाख रूपये किंमतीचा गुटका पकडला एक आरोपी अटकेत...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत २ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास मानेगाव फाटा तालुका जळगाव जामोद येथे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सुमारे २० लाख ४४ हजार ७२० रुपयाचा गुटखा घटनास्थळावरून जप्त केला. सदर कारवाई जळगाव जा. पोलिसांनी केली. घटनास्थळी सचिन सुधाकर अवचार यांना एका मालवाहू वाहनाने कट मारल्याने मानेगाव फाटा येथे जखमी केल्याचे पोलीस स्टेशनच्या लँडलाईन फोनवर फोन आल्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे कर्तव्यावरील ठाणे अंमलदार ग्यानसिंग राठोड यांनी सांगितल्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी हे घटनास्थळी शासकीय वाहनाने रवाना झाले. घटनास्थळी उभा असलेल्या बोलेरो मालवाहू वाहन क्रमांक एमएच 48 एवाय ३४२१ या वाहनात महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या वरील वर्णनाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. यामध्ये मिळालेला माल खालीलप्रमाणे साठा आढळून आलेला आहे. यामध्ये ३० हजार किमतीचे सुप्रीम डेली सीएस पानपरा ग पान मसाला व ४०हजार ८०० रु. किमतीचा प्रीमियम पान परागमसाला २१ हजार ६०० रुपये किमतीचा पान पराग एक्स्ट्रा प्लस पान मसाला २४ रुपये किमतीचे एक्सपी पाऊच १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला १२ हजार किमतीचे सुगंधी तंबाखू ४ लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला ४८ हजार ४०० रुपये किमतीचे सुगंधित तंबाखू ७ लाख ७७ हजार ९२० रुपये किमतीचे केसर युक्त विमल पान मसाला ८८ हजार किमतीचे सुगंधी तंबाखू व ४ लाख रुपये किमतीचे जुने वापरते महिंद्रा पिकअप कंपनीचे मालवाहू वाहन असा असाए एकूण २० लाख ४४ हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. फर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे वय ५१ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्रीराम विष्णू भोबे वय २२ राहणार अलमपूर तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक १२६/२०२५ कलम अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६(२) २७ (३) (d). २७ (३ )(e), ३(१)(zz)(iv) ५९ सह कलम भारतीय न्याय संहिता कलम २२३, कलम २७४ कलम २७५ कलम १२३ अनवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून येत्या काळात या कारवाईने नक्की लगाम लागेल. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे करीत आहेत.

Previous Post Next Post