धारणी-तलई रस्त्याची दयनीय अवस्था त्वरित दुरुस्तीची मागणी..
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
येथून जवळच दोन किमी अंतरावर असलेल्या तलई गावाला जाणारा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. अनेकांचे या रस्त्यावर अपघात झाले आहे. रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता, हे अद्याप समजले नाही.
दळणवळणाच्या दृष्टीने येथील गावकऱ्यांना दररोज धारणी येथे यावे लागते. सोबतच टाकरखेडा व चिखलपाट तलई येथील लोकांना व विद्यार्थ्यांना नियमित शाळेत यावे लागते. या रस्त्याने मुलांना सायकल चालविणे कठीण होते. बरेचदा अनेक विद्यार्थ्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. दररोज नवनवीन अपघातांची श्रृंखला असते. याबाबत वेळोवेळी शासनाला गावकऱ्यांनी निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली; परंतु त्या मागणीला शासनाने गांभीर्याने घेतले नाही. म्हणून तर तलाई कॅम्प टाकरखेडा व चिखलपाट या गावातील गावकऱ्यांनी लवकरात लवकर सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
