मानधनासाठी पंचायतसमितीवर धडकले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत युवा प्रशिक्षणार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. त्यांनी निवेदनाद्वारे मानधन मिळण्याची मागणी केली आहे.
धारणी पंचायतसमिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना अद्याप मानधन मिळाल्याने त्यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत त्वरित मानधन देण्याची व प्रशिक्षण कालावधी वाढविण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.इतर विभागाचे मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थ्यांची मानधन मिळाले असून केवळ ग्रामपंचायत स्तरावर कार्य करणाऱ्या युवकांना मानधन मिळाले नसल्याने लाडक्या भावांना आर्थिक समस्यांची झुंज द्यावी लागत आहे. म्हणून राणीगाव, गोलाई सर्कलच्या ग्रामपंचायत स्तरावरील प्रशिक्षणार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे त्वरित मानधन देण्याची मागणी केली आहे.
