शेतकऱ्यांची समस्या कोण लावणार मार्गी शेतात पिकांची नासाळी! व शेतात शेतकऱ्यांचे जाणे येणे बंद ? तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा तेच ते समस्या!
अकोला जिल्हा प्रतिनिधी...
बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम कारंजा रमजानपूर व नया अंदुरा या गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आहेत. कारंजा व नयाअंदुरा लघु पाटबंधारे विभाग अकोला.यांनी पानकास नदीवर कारंजा येथे धरणाचे बांधकाम केले आहे. त्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सर्व जुने वहिवाटीत पूर्व पश्चिम दिशेला असलेले शेत रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे शेतात जाण्यासाठी चारही बाजूचे रस्ते बंद झाले आहेत . शेतीची मशागत, पीक जमा करणे, त्यांची देखभाल करणे घ्या सर्व गोष्टीं करता प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. परंतु शेत रस्ते पाण्यात असल्याने शेतकऱ्यांना येणे जाणे करने मोठ्या प्रमाणात कठिन झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी मागील वर्षी १२ सप्टेंबर रोजी तहसीलदार एसडीओ जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना शेतात येणे जाणे करण्यासाठी नवीन शेतरस्ते मिळण्यासाठी निवेदन सुद्धा दिले होते . तसेच आमदार खासदार यांना सुद्धा निवेदन दिले होते .असे शेतकऱ्यांचे म्हणणे .आहे परंतु शासन व प्रशासन जनप्रतिनिधि यांच्याकडून काहीच दखल घेण्यात आली नाही . असा आरोप शेतकरी करीत आहेत . शेतकरी बड़ी राजा हे नाव फक्त राजकारणा पूर्तेच कागज पत्रावर आहे असे आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केले आहे.शेतकऱ्यांनी शेतरस्त्या करीता पालकमंत्री,जिल्हा अधिकारी पाटबंधारे विभाग अकोला उपविभागीय अधिकारी बाळापूर. तसेच तहसिलदार बाळापूर यांना लेखी निवेदन देण्यात आले त्यामुळे आज दिनांक २७ मार्च २०२५ रोजी सकाळ पासुन गेलेल्या शेत रस्त्या साठी सर्व शेतकऱ्यांनी घरणाच्या भिंती समोर कारंजा रमजानपूर आमरण उपोषना करिता बसलेले आहेत .जो पर्यंत आमच्या समस्या पुर्ण होत नाहीत तोपर्यंत आमारण उपोषण चालूच रहाणार असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगीतले आहे.तसेच उरळ पोलिस स्टेशनचे नुकतेच रुजु झालेले .ठानेदार अभिषेक अंधारे यांनी भेट दिली..
