आदिवासी व पारधी समाजातील नागरिकांवर झालेल्या अन्याय ग्रस्तांच्या न्याय मागणीसाठी निवेदन...


 
आदिवासी व पारधी समाजातील नागरिकांवर झालेल्या अन्याय ग्रस्तांच्या न्याय मागणीसाठी निवेदन...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बीड जिल्हयातील झपेवाडी तालुका शिरूर येथील निरपराध आदिवासी पारधी समाजातील महीला,मुली ,पुरुष यांच्यावर झालेला अन्याय अत्याचार दूर करून त्यांना मूलभूत हक्क मिळण्यास तसेच दिनांक 23,03,2025 रोजी कहूपट्टा तालुका जळगांव जामोद जिल्हा बुलडाणा शिवारात भूवांनसिंग मुजलदा यांच्या परिवारावर शेतात जाऊन झालेला प्राणघातक हलयाबाबत आज दिनांक 27,03,2025 ला जय आदिवासी यूवा शक्ति शाखा बुलडाणा यांच्या वतीने तहसिलदार साहेब संग्रामपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना वरील निवेदन देण्यात आले.वरील दोन्ही घटना मानवी समाजाला काळीमा फासणारी आहे पिढ्यन्पिढ्या आदिवासी समाजावर अन्याय होत आहे आणि आज सुद्धा होत आहे आदिवासी समाज रानोमाळ राहून आपली उपजीविका करतात तिथेही गावगुंड, सरकारी अधिकारी त्यांना जगू देत नाही अशा परिसथितीमध्ये आदिवासी समाजाने कुठे जावे असा प्रशनही उपस्थित होते. असे जिल्हाध्क्ष सोपान भाऊ सोळंके यांनी बोलतांना सांगितले तसेच दोंन्ही प्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कार्यवाही करून त्यांच्यावर ॲक्ट्रसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी जिल्हाअध्यष सोपान सोळंके सर तसेच भगवाणभाऊ पवार, मंगलसिंग पवार बाळुभाऊ डाबेराव गजानन डाबेराव जीवन पवार श्यामसिंग चव्हाण सोपान डाबेराव अजित डाबेराव कैलाश पवार सोपान प्रल्हाद सोळंके पवन राऊत निलेश डाबेराव तथा बहुसंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post