रुग्णवाहिकेत गर्भवतीसह पोटातील बाळाचाही मृत्यू..धारणी तालुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना...


 
रुग्णवाहिकेत गर्भवतीसह पोटातील बाळाचाही मृत्यू..धारणी तालुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

 प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात येत असलेल्या गर्भवती महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारणी लुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घडली. या घटनेमुळे मेळघाटातील बालमृत्यू व माता मृत्यूचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मधू शंकर जावरकर (कसाईखेडा, धारणी) असे मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. मृत महिला ही धारणी तालुक्यातील कसाईखेडा गावातील रहिवासी होती. ती सात महिन्यांची गर्भवती होती. बुधवारी या २२ वर्षीय गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिकेद्वारा नेण्यात येत होते. परंतु रुग्णालयात नेत असताना प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. या महिलेला प्राथमिक केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणी महिलेचा मृत्यू झाल्याने बालदेखील दगातल्याचे सांगितले

मदत पुरवली, आरोग्य विभागाचा दावा...

गरोदर महिलेला आरोग्य विभागामार्फत संपूर्ण मदत करण्यात आली. तसेच उपचार पुरविण्यात आले. तिला वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर आरोग्य पथक उपस्थित होते. त्यांनीच गरोदर महिलेवर उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धारणी येथे पाठवले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. डॉक्टरांनी मातेची तपासणी केली असता मातेचा रक्तदाब वाढलेला होता व छातीत दुखत होते. तसेच मळमळ व कफाचा त्रास होत होता. लक्षणानुसार डॉक्टरांनी उपचार करून तिला धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे संदर्भित केले होते.

प्रकृतीमध्ये अचानक गुंतागुंत..

मेळघाटमध्ये माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मधू शंकर जावरकर ही माता अतिजोखमीची असूनही तिचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने अथक प्रयत्न केले. तरीही प्रकृतीमध्ये अचानक गुंतागुंत निर्माण होऊन मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

Previous Post Next Post