रोजगार उपलब्धते साठी ग्रामीण भागातही उद्योग उभारा - आ. डॉ. संजय कुटे..


 रोजगार उपलब्धते साठी ग्रामीण भागातही उद्योग उभारा - आ. डॉ. संजय कुटे..कच्च्या मालावर आधारित उद्योग उभारणीसाठी जळगाव जामोद मतदारसंघ पारिपूर्ण...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

राज्याच्या अर्थसकल्पीय अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहाचे लक्ष वेधताना आ.डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, सिंचन, शिक्षण,परिवहन, रोजगार आणि उद्योग यासह अनेक विषयांना हाथ घालत सविस्तर भाषण केले.यावेळी उद्योग आणि रोजगार या विषयी बोलताना कच्या मालावर आधारित उद्योग हे ग्रामीण भागात उभारले गेले पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी सरकार कडे केली. राज्यात दरवर्षी लाखो कोटींचे उद्योगावर करार होतात आणि त्यातील बहुतांश उद्योग हे मुबंई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या परिसरातच सुरु होतात त्यामुळे राज्यातील प्रत्येक तरुणाला रोजगारासाठी या महानगरा कडे जावे लागते, हेच उद्योग जर राज्यातील मूलभूत सोयी सुविधा ने परिपूर्ण असलेल्या मतदारसंघात उभारल्यास ग्रामीण भागातील तरुण युवकांचे स्थलांतर थांबुण त्यांना घराजवळच रोजगार उलब्ध होईल त्यामुळे अशे उद्योग उभारण्या बाबत राज्य सरकार ने ठोस पावले उचलत एक समिती गठीत करावी आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा जेणे करून राज्यातील ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होईल अशी मागणी आपल्या या भाषणातून त्यांनी सरकार कडे केली. 

राज्यामध्ये अशे अनेक मतदारसंघ आहेत कि जिथे कच्च्या मालावर आधारित उद्योग उभारता येऊ शकतात याबाबत उदाहरण देतांना अशे उद्योग उभारण्यासाठी ज्या जळगाव जामोद मतदारसंघांत उद्योगासाठी ज्या मुलभूत सुविधांची आवश्यकता असते त्या आज पुर्ण झाल्या असुन त्यात उद्योगासाठी लागणारे पाणी, विज, सौर ऊर्जा, प्रशस्त असे राज्य व राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे नेटवर्क, पुरेशे मनुष्यबळ आणि कच्या मालाची सुबत्ता असल्याने गरज आहे ती उद्योग उभारण्याची यावर मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा अशी मागणी सभागृहात केली.

_________________________________________

हा विषय केवळ जळगाव जामोद मतदारसंघांसाठी नव्हे तर पुर्ण राज्यातील ज्या ज्या मतदारसंघामधे उद्योगासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत त्या त्या सर्व मतदारसंघासाठी ही बाब लागु होत असल्याने याबाबत धोरणत्मक निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा त्याकरिता गरज असेल तर तशी समिती गठीत करावी व येणाऱ्या पाच वर्षीच्या कार्यकाळात ग्रामीण भागात उद्योग उभारणीसाठी औद्योगिक क्षेत्र निर्मिती करावे. 

आ.डॉ.संजय कुटे

Previous Post Next Post