विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कृतीयुक्त शिक्षणाची गरज... डॉ. किशोर केला..विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण.
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन 9 एप्रिल रोजी करण्यात आले होते.... प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कृतीयुक्त शिक्षण याची गरज असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला यांनी काढले .विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा तसेच सहशालेय उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षीच हा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो... दरम्यान शाळेत संपन्न झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ.स्वाती केला यांच्यासह शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे, विनोद ईश्वरे, मनीषा म्हसाळ, अरुणा व्यवहारे, राजेश लोहिया हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते... यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत करण्यात आला.. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले....