जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..२ आरोपी अटकेत...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आयपीएल मॅच मध्ये हार जीत वर जुगार खेळताना व खेळवितांना मिळून आल्याने दोन आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे व त्यांच्या पथकाने कारवाई करून अटक केले असून ही कारवाई दिनांक १३ एप्रिल रोजी संभाजीनगर बुलढाणा येथे करण्यात आली. १३ एप्रिल रोजी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील संभाजीनगरात दोन इसम हे आयपीएल मॅच मध्ये हार जीत वर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे व त्यांच्या टीमने धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपीचे नाव जगदीश भोसले राहणार संभाजीनगर बुलढाणा व रवी भोसले राहणार संभाजीनगर बुलढाणा यांच्या ताब्यातून एलईडी ३२ इंच टीव्ही किंमत १५ हजार रुपये, एम आय कंपनीचा मोबाईल किंमत १२ हजार रुपये, ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत १५ हजार रुपये, असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा , अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव ,उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे व पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा पी आय यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाडे, हेड कॉन्स्टेबल एजाज खान, हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल विजय पैठणे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले, महिला कॉन्स्टेबल दिपाली चव्हाण यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.