महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जळगांव जामोद येथे उत्साहात साजरी...आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सौंदर्रीकरण कामाचे भव्य लोकार्पण संपन्न...


 
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  जळगांव जामोद येथे उत्साहात साजरी...आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते  डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सौंदर्रीकरण कामाचे भव्य लोकार्पण संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक सौंदर्यकरणाचे लोकार्पण डॉक्टर आंबेडकर जयंती दिनी सकाळी ८ वाजता जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉ. संजय कुटे आणि भारतीय जनता पार्टी चे  पदाधिकारी यासह महायुतीचे पदाधिकारी व भीम अनुयायी यांचे उपस्थितीत हा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यासह जळगांव जामोद शहरातील  पंचशील नगर,  सिद्दार्थ नगर व भीम नगर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ला  माल्यार्पण करून अभिवादन करण्यात  आले.पंचायत समिती चे गट विकास अधिकारी व त्यांचे कर्मचाऱ्यांनी आयोजित  बाईक रॅली ला आ.  कुटे हे उपस्थित राहिले सदर रॅली ची सुरवात ही पंचायत समिती येथून करण्यात आली. ही रॅली तहसील दुर्गा चौक, चौभारा, मानाजी चौक, चावडी, बाहेरील पुरा, असा मार्गक्रमण करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅली चा समारोप करण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी लोकार्पनाचा भव्य सोहळा शहरातील नागरिक पदाधिकारी यांचे उपस्थिती मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी मुख्याधिकारी सुरज जाधव,  गटविकास अधिकारी संदीप मोरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत निचड, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, निलेश शर्मा,देविदास घोपे , कैलास पाटील, संजय भुजबळ, सुनीता म्हसाळ,लताताई तायडे,सुनीता नानकदे, माधुरीताई राणे, पार्वताबाई इंगळे, संतोष वानखडे, ओंकार वानखडे, देवा दामोधर, अँड वानखडे, प्रशांत अवसरमोल,बंडू वानखडे, उत्तम वानखडे, देविदास तायडे ,सुनील गव्हांदे,सुदाम गवई , विलास तायडे यांचे सह हजारो नागरिक या लोकार्पण सोहळ्यात उपस्थिती होते.

Previous Post Next Post