श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात आहार आणि आरोग्य या विषयावर कार्यशाळा संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात दिनांक ९ एप्रिल रोजी गृहअर्थशास्त्र विभागा अंतर्गत आहार आणि आरोग्य यांचा मानवी जीवनावर तसेच किशोरवयीन मुलांवर काय परिणाम होतो या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली .या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश माई सर होते तर मार्गदर्शक डॉ.कविता पराग गोमासे त्वचारोग तज्ञ या होत्या तसेच हा कार्यक्रम प्रोफेसर डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाली यानंतर पाहुण्यांचे शब्द सुमनाने स्वागत कुमारी आरती राजुरकर हिने केले .कार्यक्रमाच्या दुसरा सत्रात आहार आणि आरोग्य यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी मार्गदर्शनाकरिता डॉक्टर कविता पराग गोमासे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की कुठल्याही आजाराचे मूळ हे आहाराशी आहे, आहार योग्य व संतुलित घेतला तर आरोग्याचा समतोल राखता येतो तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या आहारात जंक फूड ,पास्ता , पिझ्झा ,बर्गर ,पाणीपुरी, भेळ यासारख्या पदार्थाचा खाण्याकडे जास्त समावेश होतो त्यामुळे स्थूलपणा तसेच वजन वाढणे, बद्धकोष्ठता यासारखे आजार उद्भवतात तसेच आहार अयोग्य असला तर त्यापासून त्वचारोग सुद्धा उद्भवतात त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे त्वचा तेलकट होणे काळे पांढरे चट्टे पडणे यासारखे त्वचेवर दिसून येतात यासाठी आहारात पूर्ण अन्न घटकांचा समावेश असावा तसेच जग पुढच्या आहारात उपयोग नसावा असे मार्गदर्शनातून पटवून दिले . यानंतर प्रा. डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी सुद्धा आपला मार्गदर्शनातून सांगितले की हे जंक फूड आपल्या आरोग्याला हानिकारक आहे ज्यामुळे हळूहळू त्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होत आहे तेव्हा किशोरवयीन मुला-मुलींनी आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करावे आहार संतुलित राहिला तर बौद्धिक व शारीरिक विकास चांगला होतो व सुदृढ आरोग्य प्राप्त होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिव्या सुभाष वानखेडे हिने केले तर प्रास्ताविक ग्रुह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका अर्चना जोशी यांनी केले तर कु.आरती राजूरकर हिने मान्यवरांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली. या कार्यशाळेच्या यशस्वी ते करिता गृह अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनी तसेच मानसि कुलकर्णी ,हर्षद धर्मे व प्राध्यापिका नीलिमा भोपळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले..!!