पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ समाजवादीचे निवेदन... दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली मागणी...


 पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ समाजवादीचे निवेदन... दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली मागणी...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत २८ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्याच्या निषेधार्थ तसेच दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी तहसीलदार यांच्यामार्फत गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देत केली आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी पोहेगाव येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांची हत्या केल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा निषेध व्यक्त करत तसेच त्यांनी काही प्रश्न या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत.

१)या अगोदर एवढे हमले झाले पण कधी धर्म विचारला नाही आतंकवादी आले गोळ्या घातल्या आणि पळून गेले, २) या हल्ल्यात धर्म विचाराण्याची वेळ दहशतवाद्यांवर का आली,३) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या दिवशीचा जम्मू-काश्मीर दौरा रद्द का केला व विदेशात का गेले, ४) नेमका घटनेच्या दिवशी पहलगाम येथील बंदोबस्त का बाहेर पाठवला गेला, पहलगाम येथे पर्यटकांच्या सुरक्षतीकरिता बंदूकधारी बंदोबस्त असतो मग त्या दिवशी बंदोबस्त का नव्हता यासह भारतातील सर्वात जास्त जवान तैनात केले जातात त्या काश्मीरमध्ये २८ लोक मारले जातात आणि एकही आतंकवादी का सापडत नाही असे महत्त्वपूर्ण प्रश्न समाजवादी जिल्हाध्यक्ष सय्यद नफिस यांनी गृहमंत्री अमित शहा यांना निवेदनाद्वारे केले आहेत तसेच झालेल्या घटनेला जबाबदार आतंकवादी संघटना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई ची मागणी समाजवादी जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी निवेदनाद्वारे केली आहे...निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्कप्रमुख अब्दुल साबिर, सादिक पठाण, सय्यद कमर,अश्पाक कच्ची,रतनभाऊ, सैय्यद इमरान,शेख मजहर,राजु वानखडे यांच्यासह समाजवादी पार्टीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Previous Post Next Post