कोल्हटकर महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र विभागात कलात्मक नमुना प्रदर्शनीचे आयोजन...


 
कोल्हटकर महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र विभागात कलात्मक नमुना प्रदर्शनीचे आयोजन... 

जळगाव जामोद प्रतिनिधी-

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात कलात्मक नमुना (डेकोरेटिव्ह आर्टिकल) प्रदर्शनीचे आयोजन गृह अर्थशास्त्र विभागांतर्गत करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गृह उपयोगी कलेच्या वस्तू तयार करून प्रदर्शनीमध्ये ठेवल्या होत्या. यात वॉलपीस, फ्लॉवर, पॉट बुके, होममेड फ्रेम, कृत्रिम फुले ,ठसे काम, असलेले पोस्टर, इन्स्टंट रांगोळी अशा विविध प्रकारच्या वस्तू तयार करून ठेवल्या तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करून ठेवण्यात आल्या. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणे तसेच स्वयंरोजगार व इव्हेंट मॅनेजमेंटला दिशा प्राप्त करून देणे हा होता.यासोबतच बी.ए.भाग एकच्या मुलींनी विविध प्रकारच्या रांगोळ्या ज्यामध्ये पारंपारिक रांगोळी, धार्मिक ठिपक्यांची रांगोळी, कलात्मक रांगोळी, पोस्टर रांगोळी, धार्मिक कलाकृती यांचा समावेश करून विविध रांगोळीचे सादरीकरण केले होते. सोबतच पुष्परचनेचा प्रकार व आकारानुसार पुष्परचना तयार करण्यात आल्या. यामध्ये त्रिकोणी, एस आकार, गोलाकार अशा पुष्परचना तयार करून त्याचे सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते तर प्रमुख अतिथी प्रा. ऋषिकेश कांडलकर , प्रा. वसंत चव्हाण व गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. अर्चना जोशी होते.यावेळी प्रा. ऋषिकेश कांडलकर यांनी मुलींना स्वयंरोजगार करून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असल्याचे सांगितले तर प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी मुलींनी कौशल्य विकास अंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. संचालन वैष्णवी ढगे हिने केले तर प्रास्ताविक प्रा.अर्चना जोशी यांनी केले. दिव्या खराटे हिने आभार मानले. यामध्ये गृहअर्थशास्त्र विभागाच्या 35 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यावेळी शंभर विद्यार्थिनींची उपस्थिती होती. यशस्वीतेकरिता प्रा. अर्चना जोशी ,मानसी कुलकर्णी, योगेश तायडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post