हिवरखेड च्या भोपळे कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार...


हिवरखेड च्या भोपळे कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार...

प्रशांत भोपळे/हिवरखेड...

हिवरखेड येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र भोपळे कॉलेजच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह तथा केंद्रप्रमुख स्नेहल भोपळे हे होते.याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश इंगळे, दीपक रायबोले, सौ मंदाताई रायबोले, प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे,यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नुकतीच रोहिनी दिपक रायबोले या विद्यार्थ्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी रोहिणीने यशस्वी वाटचालीबद्दल आपल्या मनोगतातून सांगितले.तिच्या आनंदाश्रूतून तिच्या आई वडिलांप्रती तिच्या संवेदना व्यक्त होत होत्या. या. कार्यक्रमाचे संचालन डॉ.मयूर लहाने तर आभारप्रदर्शन सुनील वाकोडे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्राचे संयोजक गणेश भोपळे, अमरदीप ढोकणे, निलेश दांडगे, पूजा घुरदेव यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post