वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा संघटक राहुल शिरसोले यांचा भाजपात प्रवेश...


 
वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा संघटक राहुल शिरसोले यांचा भाजपात प्रवेश...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ संजय कुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षाचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील यांचे नेतृत्वात राहुल शिरसोले,व संजय इंगळे याचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश संग्रामपूर तालुक्यातील सहकार महर्षी ज्येष्ठ नेते स्व.दत्तूसेठ शिरसोले यांचे नातू तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा जिल्हा संघटक राहुल संजय शिरसोले आणि प्रगतीशील युवा शेतकरी संजय मुरलीधर इंगळे यांनी जळगाव जा.विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार डॉ.संजय श्रीराम कुटे माजी मंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.भाजप सरकारची कार्यप्रणाली, विकासाभिमुख दूरदृष्टी केंद्रात, राज्यात तसेच मतदारसंघात होत असलेली प्रगती नक्कीच यासाठी प्रेरणादायी ठरली आहे.पक्षमार्फत जनकल्याणकारी काम करणार असल्याचे मत यावेळी पं.स.मा.सभापती पांडुरंग इंगळे यांनी व्यक्त केले.राहुल शिरसोले यांच्या भाजप परिवारातील प्रवेशाने पक्ष अजून मजबूत होईल यात शंका नाही, नेहमीच संग्रामपूर शहरातील विकासासाठी नागरिकांच्या सुख सोयींसाठी झटणारा, मजबूत संघटन कौशल्य असलेला सहकारी मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे.यावेळी संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील,कृ.ऊ.बा.संग्रामपूरचे संचालक मा.उमेश टावरी व श्रीकांत मारोडे संग्रामपूर शहरातील ओमप्रकाश धूत,रमेश चोपडे,जयराम इंगळे, प्रा.रमेश राजनकर सर,संभाजी गोतमारे,अरुण बेंदरकर,राजेश मुयांडे,संजय बोरसे,उमाकांत शिरसोले सर तसेच इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous Post Next Post