केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांना कश्मीरमध्ये पाहताच..भयभीत पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! विशेष रेल्वेची करून दिली सुविधा उपलब्ध..▪️ परतीचा मार्ग मोकळा...


 
केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांना कश्मीरमध्ये पाहताच..भयभीत पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! विशेष रेल्वेची करून दिली सुविधा उपलब्ध..▪️ परतीचा मार्ग मोकळा...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख...

जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर भयभित झालेल्या आणि जम्मू काश्मिरमध्ये अडकुन पडलेल्या पर्यटकांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन घेतली भेट.. तुम्हाला घरी सुखरुप पोहचविण्यासाठी रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल या पर्यटकांना आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे.जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहे मृतकांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत. शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते बुलढाणा जिल्हयातील जवळपास 49 पर्यटकA जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनांसाठी गेलेले आहेत हे सर्व पर्यटक सुखरुप आहेत. आज 24 एप्रिलच्या सकाळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू-काश्मीरला गेले पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे. घाबरू नका तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे, असं पर्यटकांना सांगतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल आज दुपारी 3 वा. जम्मू कश्मीर वरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार आहे दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे पोहचणाऱ्या रेल्वेने त्यांना पाठवल्या जाणार आहेत या सर्व पर्यटकांसाठी विशेष रेल्वे बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी अनेक पर्यटकांनी व पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता त्यांना घरी सुखरुप पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गृहमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेत.

Previous Post Next Post