खामगावात महसूल विभाच्या आशीर्वादाने गीट्टी खदान मध्ये अवैध उत्खनन..लाखो रुपयांचा महसूल बुडाला प्रकरणी तत्काळ चौकशी करा..!!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
सचिन अंबादास जगदाळे तालुका अध्यक्ष केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे वतीने जिल्हा अधिकारी बुलडाणा व ,तहसीलदार खामगाव यांचे दालनात निवेदन सादर करण्यात आले,निवेदनात नमूद केले की खामगाव महसूल विभागाच्या आशीर्वादाने परिसरात अवैध्य गीट्टी खदान वर अवैधरीत्या उत्खनन करून लाखो रुपयाचा महसूल बुडाला असल्याने शासनाने प्रशासनाचे प्रतिमा मलिन होत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ग्राम शेलोडी येथे सुरू असलेल्या अवैद्य स्टोन क्रेशर.वर अवैध उत्खनन सुरु असल्याची तक्रार निवेदनात नमूद केले की ग्राम शेलोडी तालुका खामगाव येथे सुरू असलेली अवैध स्टोन क्रेशर. व अवैध उत्खनन करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती परंतु तहसीलदार यांनी प्रकरणी तलाठी यांनी घटना पंचनामा स्थळ निरीक्षण अहवाल वारंवार तहसीलदार खामगाव यांना देण्यात आला असून तहसीलदार यांनी कारवाई न केल्याने तहसीलदार यांचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, अवैध्य स्टोन क्रेशर मालक यांनी शासनाने दिलेल्या परवानापेक्षा जास्त उत्खनन करून परवानगी नसताना अवैध्य स्टोन क्रेशर चालवीत असून मालक हे .खामगाव तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या येथील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चिरीमिरी करून शासनाची व प्रशासनाची दिशाभूल करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम महसूल विभागचे आशीर्वादाने होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला,अवैध्य स्टोन क्रेशर वर व अवैधरीत्या खनिज माती,मुरूम उत्खनन प्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदनावर सचिन अंबादास जगदाळे यांची सही आहे.