टेंभूर्णा येथील कर्तव्यदक्ष सरपंच सौ भारती श्रीकृष्ण मोरे ह्या आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित...
अकोला जिल्हा प्रतिनिधी: -
अहिल्या नगर सरपंच सेवा संघमहाराष्ट्र राज्य आयोजित मानकर्तृत्वाचा । सन्मान नेतृत्वाचा॥ राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२५ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांना आदर्श सन्मान पुरस्कार दिला जातो आत्मविश्वासाने जिद्दीने ध्येय साध्य करीत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये उतुंग कामगिरी करून समाजाचे कल्याण करण्यासाठी सतत धडपडत कार्य करीत असल्याने अभिमानास्पद संघर्षातून मिळणारे मोठे यश पाहून सौ भारती श्रीकृष्ण मोरे (सरपंच) यांना आदर्श सरपंच पुरस्कार सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक संघटनेचे नेते एकनाथराव ढाकणे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, संपर्कप्रमुख अमोल शेवाळे यांच्या प्रमुखउपस्थिती मध्ये सिने अभिनेते मकरंदभाऊ अनासपुरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन आदर्श सरपंच पुरस्काराने सौ. भारती श्रीकृष्ण मोरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित माजी सरपंच भिमशक्ती जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवा काळणे. संतोष जिरगे खंडू खाडपे. संघप्रिय मोरे यांच्यासह महाराष्ट्र राज्यातून आलेले सरपंच सेवा संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा अहिल्या नगर माऊली सभागृहामध्ये संपन्न झाला.