महामानवाच्या संयुक्त जयंती निमित्त झाडेगाव येथे रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-
दि १५ एप्रिल २०२५ रोजी जळगांव जामोद तालुक्यातील झाडेगांव येथे महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भीमशक्ती नवयुवक मंडळ, नालंदा युवक मंडळ शिवराणा मंडळ, आदिशक्ती मंडळ यांनी सारथी फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन जळगांव खान्देश यांच्या माध्यमातुन भव्य रक्तदान शिबिर आणि गावातील व परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्याची तपासणी करून घेतली आणि रक्तदान शिबीरामध्ये सुद्धा अनेक युवकांनी रक्तदान करून महामानवांना आदरांजली वाहिली या प्रसंगी झाडेगांव गावचे सरपंच रामरतन चोपडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विश्वासराव पाटील व सारथी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश भिसे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील बोदडे ,दिनकर चोपडे, ग्रामपंचायत सचिव चव्हाण साहेब,राजीराम आगरकर, मधुकर चोपडे ,अभिमन्यू पिसे , दशरथ भाऊ काळंगे , मोहन पिसे , उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे,आनंद गवई ,रवींद्र तायडे प्राध्यापक मेहेंगे सर, किशोर अवचार, प्रविण आगरकर,अमोल चोपडे, प्रफुल्ल तायडे ,योगेश डोंगरदिवे, रोशन तायडे , ज्ञानेश्वर ठाकरे,वैभव वानखडे यांनी प्रयत्न केले तथा सर्व गावकरी मंडळी उपस्थिती राहून शिबिर योग्यरीत्या पार पाडले.