आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यामध्ये विकासाची दुरदृष्टी -आ.रणधीर सावरकर...श्री नरसिंग महाराज संस्थान येथे पार पडला लोकार्पण सोहाळा....


 
आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यामध्ये विकासाची दुरदृष्टी -आ.रणधीर सावरकर...श्री नरसिंग महाराज संस्थान येथे पार पडला लोकार्पण सोहाळा....

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

आकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शासनाच्या विविध निधी अंतर्गत निधी आणुन विकास कामे पुर्ण केली आहेत त्यांच्यामध्ये विकासाची दुरदृष्टी आहे असे प्रतिपादन भाजपा विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद तथा प्रदेश भाजपा सरचिटणीस आ.रणधीर सावरकर यांनी केले ते नरसिंग महाराज संस्थान येथे बहुउद्देशीय सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणुन बोलत होते.              यावेळी अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पर्यटन विकास निधीअंतर्गत ४ कोटी ११ लक्ष ५० हजार रुपयाचा निधी श्री नरसिंग महाराज संस्थान येथे बहुउद्देशीय सभागृह बांधकामाकरीता मंजुर करवुन आणला त्या निधीअंतर्गत बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता त्याचे लोकार्पण आ.प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी भाजपा विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद तथा प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर विशेष अतिथी म्हणुन लाभले होते तर मुर्तिजापुरचे आमदार हरिष पिंपळे,विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, अकोला जिल्हा भाजपा ग्रामिणचे अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थीती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.स्व.संघाचे जिल्हासंघचालक अॕड मोहनराव आसरकर होते तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकरराव मानकर,माजी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे,पुरुषोत्तम चौखंडे रामचंद्र बरेठीया यांच्यासह राजेश नागमते,संतोष झुनझुनवाला,उमेश पवार,राजेश रावणकर ,राजेश भालतिलक, हरिष टावरी याची प्रमुख उपस्थीती लाभली होती.आ.सावरकर यांनी पुढे बोलतांना आकोट ते आमलापुर रेल्वे ब्राॕडगेजच्या कामाला मंजुरी मिळाली असुन कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे व्यापार सोईचा होईल व वाहुतुक खर्च कमी होईल त्याचा लाभ व्यापा-यांसह सर्वांना होईल असे सांगितले, आ.भारसाकळे यांनी आकोट येथे तहसिल कार्यालय ,उपजिल्हा रुग्णालय,सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यालय,छञपती शिवाजी महाराज पार्क,रस्ते आदिसह विविध कामे मंजुर करवुन आणली असुन त्याचा लेखाजोखा मांडला तर आ.पिंपळे यांनी तरुणाला लाजवेल असा उत्साह आ.भारसाकळे यांच्यामध्ये असुन विकास कामांकरीता निधी खेचुन आणण्यास त्यांचा हातखंडा असल्याचे उदगार काढलेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला फीत कापुन व दगडाचे अनावरण करुन सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले तदनंतर श्री संत नरसिंग महाराज यांची प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी मिलींद महाराज बिडवई,छबुनाना महाराज शिराळकर व किरण महाराज आसरकर यांनी शांतीपाठाचे पठन केले, त्यानंतर संस्थानचे अध्यक्ष सतिष आसरकर यांचेसह संदिप आसरकर, संजय आसरकर व मिलींद आसरकर यांनी मान्यवरांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व महाराजांची पोथी देऊन संस्थानतर्फे सत्कार केला,सा.बा.विभागाचे उपविभागीय अधिकारी राजीव सुलतान,कनिष्ठ अभियंता शुभम म्हैसने तथा कंञाटदार सुरेश नाठे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला,शंशाक भावे व त्यांच्या चमुने संगिताच्या तालावर महाआरती गायीली,त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संचलन व आभार माजी नगरसेवक मंगेश लोणकर यांनी केलेत,कार्यक्रमाला महिला,पुरुषांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती,कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता गोपाल मोहोड,संजय जोशी, श्रीकृष्ण आष्टीकर,अनिरुध्द देशपांडे,विक्रमसींग ठाकुर, शितलकुमार शर्मा, गणेश बोंडे,अशोक पुंडकर आदिसह सेवेक-यांनी प्रयत्न केले.

Previous Post Next Post