१८ लोककलावंत जखमी; एक गंभीर...चालकाला रात्रभर वाहन चालवून झोपेची डुलकी आल्याची शक्यता पोलिसांकडून तपास..परतवाडा-अमरावती मार्गावर चारचाकीला अपघात..


 १८ लोककलावंत जखमी; एक गंभीर...चालकाला रात्रभर वाहन चालवून झोपेची डुलकी आल्याची शक्यता पोलिसांकडून तपास..परतवाडा-अमरावती मार्गावर चारचाकीला अपघात..

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अमरावती येथील विमानतळ उद्घाटनप्रसंगी आदिवासी लोकनृत्य सादर करण्यासाठी धारणी येथून निघालेल्या वाहनाला परतवाडा-अमरावती मार्गात मेघनाथपूरजवळ बुधवारी पहाटे ५ वाजता अपघात झाला. अपघातात १८ जण जखमी झाले. यापैकी तिलक कासदेकर (१२) याला अमरावती येथे दाखल करण्यात आले.

दीपक कासदेकर (१७), मौजीलाल पाटणकर (६५), स्वास्तिका कासदेकर (१७), भारती मावसकर (१७), संगीता कासदेकर (१८), नंदलाल धांडे (६०), मंगल कासदेकर (६०), काशीराम जांभेकर (५०), कालू मावसकर (५०), बेबू मावसकर (५५), विशाल पाटील (२१), संजय जावरकर (१८), गोविंद जावरकर (४५) राज मावसकर (५५, सर्व राहणार बेरदाबल्डा) व चालक संदीप भिलावेकर (२५, रा. राणा मालूर) अशी अन्य जखमींची नावे आहेत. सरमसपुरा पोलिसांनी चालक संदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

__________________________________

--झाडाला धडकले वाहन--

विमानतळाच्या उ‌द्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री येणार असल्याने धारणी येथून बेरदाबल्डा येथील आदिवासी चारचाकी वाहनाने निघाले होते. बोरगाव दोरी ते मेघनाथपूर फाट्यावर ते वाहन झाडावर आदळले. अपघाताच्या परिणामी वाहनाचे एक्सेल तुटले.

_________________________________

तोंडी सूचनेवर निघाले आदिवासी...

विमानतळ उ‌द्घाटनासाठी कोरकू आदिवासींचे पारंपरिक गादुली नृत्य सादर करण्यासाठी पथक बेरदाबल्डा येथून निघाले होते. तहसीलमधून तोंडी सूचना मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीच ते वाहनाने निघाल्याची माहिती गानूजी सावरकर यांनी दिली.

_________________________________

जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- नीलेश गोपालचावडीकर, ठाणेदार, सरमसपुरा

Previous Post Next Post