भद्रावती येथे होणाऱ्या दोन दिवसीय खुल्या अधिवेशनाबाबत अ.भा.ग्रा.पत्रकार संघ जळगाव जामोद तालुका बैठक संपन्न...


 
भद्रावती येथे होणाऱ्या दोन दिवसीय खुल्या अधिवेशनाबाबत अ.भा.ग्रा.पत्रकार संघ जळगाव जामोद तालुका बैठक संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे २ दिवसीय खुले अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे दिनांक ३ मे २०२५ व ४ मे २०२५ रोजी होणार असून त्यासंदर्भात बैठकीचे आयोजन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना जळगाव जामोद च्या वतीने दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी भद्रावती येथे होणाऱ्या दिनांक ३ व ४ मे २०२५रोजी दोन दिवशीय खुल्या अधिवेशना बाबत जळगाव (सर्किट हाऊस) विश्रामगृह येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची बैठक तालुका अध्यक्ष किशोर दाताळकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सदर बैठकीत तालुक्यातील  पत्रकारांनी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय अधिवेशना बाबतीत चर्चा केली व अधिवेशनात जाण्यासाठी ठरविले ह्यावेळी बैठकीत प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी अधिवेशना बाबतीत माहिती दिली तर केंद्रीय सदस्य अभिमन्यू भगत यांनी अधिवेशनात जाण्यासाठी दिनांक ३ मे २०२५ ला जळगांव (जा) विश्रामगृह येथे सकाळी ७:०० वाजता हजर राहण्यासाठी सांगितले.अधिवेशन स्थळी जाण्यासाठी सोयीच्या होऊन रस्त्यातील सेवाग्राम, वरोरा पाहता येईल तर तालुका अध्यक्ष किशोर दाताळकर यांनी अधिवेशनात येणाऱ्या पत्रकारबंधुनी त्यांची नांवे प्रदेश कार्यालय प्रमुख मंगेश राजनकार, केंद्रीय सदस्य अभिमन्यू भगत, संतोष कुलथे व तालुका अध्यक्ष यांना दिनांक ३०/०४/२०२५ रोजी दुपार पर्यंत देण्यासाठी आवाहन केले आहे . जेणेकरून अधिवेशना करिता येणाऱ्या पत्रकारबंधुची गैर सोय होणार नाही.बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय सदस्य अभिमन्यू भगत, प्रदेश कार्यलय प्रमुख  मंगेश राजनकार, आर.सी.२४ न्युज संपादक राजेश बाठे, संतोष कुलथे, अमोल भगत,अनिल भगत,मंगेश बहुरूपी , दत्तु दांडगे ,अमर तायडे सह अन्य पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती.

Previous Post Next Post