बुलढाण्यात उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जनआभार यात्रेची ऐतिहासिक सभा संपन्न...


 
बुलढाण्यात उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जनआभार यात्रेची ऐतिहासिक सभा संपन्न...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

नुकताच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांसाठी बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार समोर आयोजित सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हल्ल्यातील बळींना आदरांजली वाहताना उपस्थित सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळले आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.यानंतर, शिवसेनेच्या जनआभार यात्रेअंतर्गत उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनी भव्य जाहीर सभेत बुलढाणावासीयांशी थेट संवाद साधला. हजारोंच्या गर्दीने गडगडलेल्या या सभेत, साहेबांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय आणि ग्वाही दिल्या.सभेत बोलताना त्यांनी बुऱ्हाणपूर, मलकापूर, मोताळा, बुलढाणा आणि चिखली या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले. तसेच, "जिथे संकट, आपदा, आपत्ती तिथे मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब" हे जनतेचे समीकरण जपताना सेवा आणि तत्परतेचा पुनरुच्चार केला. देशाच्या सुरक्षेसंदर्भातील बैठकीत अनुपस्थित राहणाऱ्या गटावर त्यांनी ठामपणे टीका केली आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे ठाम आश्वासन दिले."लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही," तसेच "महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत साडेपाच लाख रुपयांचे आरोग्यविमा संरक्षण मंजूर करण्यात आले आहे," अशा ठोस घोषणांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला."जनतेची सेवा करणे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच माझे जीवनाचे ध्येय आहे," असे त्यांनी अत्यंत भावनिक शब्दांत व्यक्त केले.या ऐतिहासिक सभेत आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी आपल्या अफाट जनाधाराचे दर्शन घडवले. संजूभाऊंच्या प्रेमासाठी हजारोंचा समुदाय स्वतःहून या सभेला उपस्थित राहिला होता. जनतेच्या हृदयात संजूभाऊंवर असलेले निस्सीम प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाले.उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांनीही संजय गायकवाड यांच्या कार्याचा उल्लेख करत बुलढाण्यात सिंचन, कृषी, शहर सौंदर्यीकरण आणि महामानवांचे पुतळे उभारण्यासारखी ऐतिहासिक कामगिरी केल्याचे गौरवोद्गार काढले. "संजय गायकवाड यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे, जी न भूतो न भविष्यति ठरेल," अशा शब्दांत त्यांनी संजूभाऊंच्या कार्याची प्रशंसा केली.ही सभा बुलढाण्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरली असून, जनतेमध्ये नवचैतन्याचे आणि विकासाचे नवे स्वप्न रुजवणारी ठरली आहे.

Previous Post Next Post