जळगाव जामोद तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर.


 जळगाव जामोद तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर...

 जळगाव(जामोद) प्रतिनिधी...

आगामी काळात जळगाव जामोद तालुक्यातील होऊ घातलेल्या ४७ ग्रामपंचायत साठीची आरक्षण सोडत दिनांक १६ एप्रिल रोजी  तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी शैलेश काळे आणि तहसीलदार पवन पाटील यांच्या उपस्थितीत एका  दहा वर्षीय बालकाच्या  हस्ते सोडत संपन्न झाली. निवडणूक विभागाचे सत्यविजय जाधव आणि कर्मचाऱ्यांनी  सोडत प्रक्रिया पार पाडण्यास सहकार्य केले.४७ ग्रामपंचायती पैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सात ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीसाठी ८  ग्रामपंचायती तर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी साठी ८ ग्रामपंचायती आरक्षित ठेवण्यात आल्या. उर्वरित ग्रामपंचायती ह्या खुल्या प्रवर्गासाठी राहिले आहेत.

_________________

असं असेल आरक्षण'_

 अनुसूचित जातीसाठी आरक्षित:१)सावरगाव २)खेर्डा बु.३) आसलगाव ४) पिंपळगाव काळे५) मांडवा ६)वडगाव गड ७)टाकळी पारस्कर .

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित:_

१) पळशी वैद्य २)हिंगणा बाळापूर ३)भेंडवळ बुद्रुक ४) सुलज ५)बोराळा बुद्रुक ६)बोराळा खुर्द ७)भिंगार ८) उमापूर 

नागरिकांचा मागास प्रवर्ग :_१)भेंडवळ खुर्द २)मडाखेड खुर्द ३)आडोळ बुद्रुक ४)मानेगाव ५)दादुलगाव ६)गोळेगाव बु. ७)गोडेगाव खुर्द ८) मडाखेड बु.

खुल्या वर्गासाठी:_१) गोळेगाव खुर्द २)अकोला खुर्द ३)खांडवी ४) कुरणगाड बुद्रुक ५)धानोरा महासिद्ध ६)पळशी सुपो ७) रसूलपूर ८)कुरणगाड खुर्द ९)काजेगाव १०) वडशिंगी ११)पिंपरी खोद्रे १२)गाडेगाव बुद्रुक १३)माहुली १४)सातळी १५)झाडेगाव १६)जामोद १७)तिवडी १८) कुंवरदेव१९)सुनगाव २०) चावरा २१)वडगाव पाटण २२)निंभोरा बुद्रुक २३) खेर्डा खुर्द २४)पळसखेड

_____________________

Previous Post Next Post