विदर्भातील दुसरे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय निर्मितीचा मार्ग प्रशस्त - आ. डॉ संजय कुटे...पुढील वर्षी प्रवेश व्हावा याबाबत महत्वाचे निर्णय...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
नागपूर नंतर विदर्भातील दुसरे शासकीय महाविद्यालय लवकरात लवकर जळगाव जामोद येथे सुरु व्हावे याकरिता आ डॉ कुटे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचेकड़े बैठक लावण्याची विनंती केली होती त्यानुसार दिनांक 23 एप्रिल रोजी याबाबत ची वैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे दालनात आज पार पडली.या बैठकीत सन 2026 या वर्षात जळगांव जामोद येथे मंजुर असलेल्या शासकीय आयुर्वेदिक विद्यालयात विद्यार्थीना प्रवेश मिळावा याकरिता ज्या ज्या अडचणी असतील त्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आ डॉ संजय कुटे व हसन मुश्रीफ मंत्री वैद्यकीय शिक्षण यांचे उपस्थिती विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने सामंजस्य करार, विद्यालया करिता पद निर्मिती, उसनवारी तत्ववार अधिकारी व कर्मचारी निर्मिती, जागा भाडे तत्वावर घेण्यास मान्यता प्रदान करणे बाबत, बांधकाम अंदाज पत्रकास मंजुरी मिळने बाबत, तसेच सर्व बाबी सुरळीत पार पाडाव्या म्हणून लेखाशीर्ष उघडणे तसेच आवश्यक यंत्र, साधन सामुग्री व साहित्य उपलब्ध होणेबाबत या सर्व महत्वपुर्ण घटकांवर सर्व संबधीत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे उपस्थितीत चर्चा होऊन अनेक महत्वपुर्ण निर्णय झाले.त्यामुळे पुढील वर्षी सदर महाविद्यालयात विद्यार्थीना प्रवेश मिळने बाबत चा मार्ग मोकळा झाला.या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार संजय कुटे, सचिव सार्वजनिक आरोग्य, सचिव वैद्यकीय, आयुक्त सार्वजनिक आरोग्य, आयुक्त वैद्यकीय शिक्षण ,संचालक वैद्यकीय शिक्षण, संचालक आयुष संचनालय मुंबई,उपसचिव वैद्यकीय शिक्षण व द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई व इतर संबधीत अधिकारी उवस्थित होते.