कोल्हटकर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीश मायी हे होते तर प्रमुख पाहुणे जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी माता सरस्वती आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून समारंभाची सुरुवात केली. मान्यवरांच्या स्वागतानंतर सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती २०२३ - २४ च्या परीक्षेत वाणिज्य व कला शाखेतून विविध विषयांमध्ये महाविद्यालयातून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. यामध्ये कु. निकिता सोनवणे, आरती अडथळे, रोहित इंगळे, चैताली आहेर, आरती दिघडे ,प्रतीक्षा इंगळे, वैभव घुले, मंगला हेलोडे ,नम्रता बाभुळकर, कोमल वानखेडे, अंकिता फुसे, पूजा कावसकर ,वैष्णवी बारबदे ,दिव्या वानखडे, मेघा वंडाले, दुर्गा काकडे, रोशनी ढगे, गायत्री भटकर ,समृद्धी दातीर, शुभम निंबाळकर, राधा ठाकरे, भारती कपले,काजल घाटे या विद्यार्थ्यांना बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आली यामध्ये सर्वाधिक बक्षिसे कुमारी निकिता सोनोने व वैभव घुले या विद्यार्थ्यांनी पटकावले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यात उच्च उद्दिष्टे ठेवून एक चित्ताने अभ्यास करावा व यश संपादन करावे अशा प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गिरीश. मायी यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यापीठ परीक्षा २०२३-२४ च्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक विनोद बावस्कर व प्राध्यापक गणेश जोशी यांनी उत्कृष्टरित्या केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक सायखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विन गिरजापुरे प्रा. अर्चना जोशी प्रा. भोपळे मॅडम यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.