अज्ञात वाहनाच्या धडकेत आसलगाव येथील २२वर्षिय तरुणाचा जागीच मृत्यू...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील २२ वर्षीय तरुण निलेश अनिल दांडगे या तरूणाचा २२ एप्रिल च्या रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे ..जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून दररोज शेकडो वाहने अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या दरम्यान अतिशय वेगाने करीत असतात … परंतु या अवैध वाळू वाहतूकीवर महसूल विभाग कारवाई तर करीतच नाही यापेक्षा या वाहनांच्या वेगावर पोलीस विभाग लगाम लावण्यास अकार्यक्षम ठरत आहे …वेगाने अवैध गौण खनिज,किंवा वाळू वाहतूकीमुळे या अगोदर सुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला …तर दिनांक २२ एप्रिलच्या रात्री घडला असून यामध्ये आसलगाव येथील निलेश दांडगे हे जळगाव हुन आपले कामकाज आटपून घरा कडे येताना रात्री १०:०० वाजे दरम्यान आसलगाव जवळील टाकळी खाती फाट्यावर जळगाव कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागिच मृत्यू झाला…या अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून जळगाव जामोद पोलीस त्याचा कसून तपास घेत आहेत…. दरम्यान मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या निलेश दांडगे या तरुणाच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अतिशय शोकाकुल वातावरणात मृतक तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले….तर या घटनेचा अधिक तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे हे करीत आहे