शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन...


 
शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कार्यवाही करा - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल यांनी दिनांक १० एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.जळगाव जामोद शहरात गेल्या महिन्याभरात काही २ समुदयात तेढ निर्माण, शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघड़ेल अश्या काही घटना घड़ल्या आहेत. धार्मिक तेढ निर्माण होऊ शकेल अश्या घटनामागे काही असामाजिक तत्व आहेत का, त्या हेतुपरस्पर घडवून आणल्या गेल्या का.? याचा शोध घेणे आवश्यक आहे, परंतु अद्यापही अशी कुठलीही कार्यवाही झाल्याचे निदर्शनास येत नाही. अश्या प्रकारच्या घटना दुर्लक्षित केल्यास त्यातुन काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोन. अश्या घटनाची सखोल चौकशी करावी व त्यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कार्यवाही करण्यात यावी.अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे बुलढाणा यांच्याकड़े जळगाव जामोद पोलिस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्फ़त निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी जळगाव जामोद शहर अध्यक्ष इरफ़ान खान, कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोड़े,माजी शहर अध्यक्ष शेख जावेदभाई, संजय ढगे,मोहसिन खान, एजाज देशमुख, दत्ता डिवरे यांच्या सह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post