जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुलेंना अभिवादन...


 
जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुलेंना अभिवादन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते समाजातील विषमता दूर करून समतेचे बिजारोपन करणारे महामानव क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ११ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातील क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्यास यावेळी अभिवादन करण्यात आले.अभिवादन कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेंनजीत पाटील, काँग्रेस कमिटीच्या पक्षनेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर,उपसभापती प्रशांत अवसरमोल, शिवसेनेचे दत्ता पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ,माजी उपसभापती माणिकराव वाघ, शिवसेना शहर प्रमुख रमेश ताडे, नितीन सातव,डॉक्टर संदीप वाकेकर, राजीव घुटे, अर्जुन घोलप,बाबू जमदार,अब्दुल जहीर, गौतम अरदळे, ज्ञानेश्वर राजनकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यासह कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ तसेच कर्मचारीवृंद क्रांतीसुर्यास अभिवादन करताना उपस्थित होते.

Previous Post Next Post