हज्जन जैतुनबी बापूमिया पटेल विद्यालयाचा पहिल्याच वर्षी 10 वी चा 100% निकाल...


                

जळगाव जामोद प्रतिनिधी:- 

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा नुकताच निकाल लागला असून पिंपळगाव काळे येथील हज्जन जैतुनबी बापुमिया पटेल विद्यालयाचा पहिल्याच वर्षी100% निकाल लागला आहे. परिक्षेत 8 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये 2 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक प्रथमेश महेंद्र सदाशिव ह्याने पटकाविला असून त्याला 83% गुण प्राप्त झाले आहे, तर द्वितीय क्रमांक शेख जै़द अहमद वसीम अहमद ह्याचा असून त्याला 77.20% गुण प्राप्त झाले आहेत, तसेच तृतीय क्रमांक काज़ी मुज़म्मील शुजाउद्दीन ने पटकाविला असून त्याला 73.40% गुण मिळाले आहेत.एकूण महाविद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष ॲड. सलीमजी बापूमिया पटेल, उपाध्यक्ष कय्युम पटेल सर, सहसचिव रब्बानीजी देशमुख, तसेच संचालक सिराजोद्दीन भाई पटेल आणि महाविद्यालयाचे प्राचार्य मो. शोएब व प्रा. मुकुंद इंगळे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील उज्जवल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post