केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद च्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम...


जळगाव जामोद प्रतिनिधी...

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेचा ऑनलाईन निकाल 13 मे रोजी जाहीर झाला... या परीक्षेमध्ये जळगाव जामोद शहरातील नामांकित केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत 100% निकालाचे परंपरा कायम राखली आहे... यामध्ये कु.श्रुती गजानन दामधर 95.60, कु. सानिका वसंत पारसकर 95%, कु. तेजश्री अशोक शिंदे 95%, सोहम संतोष पिंजरकर ९४.६० आणि कु. सानिका गजानन मुंडे 94.20 हे विद्यार्थी गुणांनुक्रमे शाळेमधून सर्वोत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत... सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी  16 विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा जास्त, 80 टक्के पेक्षा जास्त 11 विद्यार्थी, 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 4 आणि 60 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.... दहावीच्या मंडळ परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला, प्राचार्य विनायक उमाळे, विनोद ईश्वरे, पर्यवेक्षिका सौ अरुणा व्यवहारे आणि मनीषा म्हसाळ तसेच शाळेच्या शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीचे शुभेच्छा दिल्या..

Previous Post Next Post