केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 100% निकालाची परंपरा कायम...


 
केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 100% निकालाची परंपरा कायम...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

 फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल पाच मे रोजी जाहीर झाला आहे... या परीक्षेमध्ये जळगाव जामोद शहरातील नामांकित केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कला, वाणिज्य मराठी व विज्ञान, वाणिज्य इंग्रजी माध्यम या चारही शाखातील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये वाणिज्य मराठी व विज्ञान,वाणिज्य इंग्रजी माध्यम या शाखेतील एकूण 113 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये जान्हवी सुरेश राखोंडे 87.67 कु.रूपाली श्रीराम दाते 85.83, कु.गौरी पुरुषोत्तम ठाकरे 82.50 हे विद्यार्थी वाणिज्य मराठी माध्यमातून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.... त्यासोबत इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेतील कु. खुशी श्रीकृष्ण पद्मन 77.67 प्रथम कु. आरती शालिग्राम पाटील 77.33 हे विद्यार्थी नाही द्वितीय क्रमांक आणि उत्तीर्ण झाली आहे.... परीक्षेमध्ये उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला, मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला प्राचार्य विनायक उमाळे, प्रकाश भुते,विनोद ईश्वरे, पर्यवेक्षिका सौ.अरुणा व्यवहारे आणि मनीषा म्हसाळ यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत...

Previous Post Next Post