पत्रकारांच्या मागण्या सोडविण्यासाठी उभा राहील..--माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन..--३ व ४ मे रोजी भद्रावती येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न--
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी-
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजमनि गार्डन व लाॅन, रेल्वे स्टेशन रोड, भद्रावती येथे पत्रकारांचे दोन दिवसीय खुले राज्यस्तरिय अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकारिता करीत असतांना पत्रकारांना अनेक अडचणींचा करावा लागतो. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमी प्रयत्नरत असतो. या अधिवेशनामध्ये पत्रकारांचे मांडलेले ठराव, प्रस्तावातील मागण्या सोडविण्यासाठी पुर्ण शक्तीने पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वस्त करतो असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.या अधिवेशनाचे उद्घाटन ४ मे रोजी सकाळी झाले. आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांनी ऑनलाईन पध्दतीने अधिवेशनाचे उद्घाटन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, मिशन आयएएसचे संचालक प्रा. नरेशचंद्र काठोळे, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर चे अधिष्ठाता प्रा.डाॅ. विश्वनाथ साबळे, नेत्रतज्ज्ञ डाॅ. चेतन खुटेमाटे, फेडरेशन ऑफ असोसिएशनचे मधुसुधन रूंगठा, सामाजिक कार्यकर्ते राम आखरे, चंद्रशेखर भडांगे, जनमंच अध्यक्ष राजीव जगताप आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी नृत्याने करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी प्रास्ताविक करीत संघटनेची माहिती दिली. संस्थापक अध्यक्ष मनोहरराव सुने यांनी आपले मनोगत व्यक्त करतांंना म्हटले की, गेल्या ३० वर्षांपासून अ.भा.ग्रा. पत्रकार संघ पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी लढा देत असुन.पत्रकार बांधवांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य झाल्या असुन बऱ्याच मागण्या प्रलंबित आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे आंदोलन सुध्दा उभारू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.व्दितीय सत्रात जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. विनायक तुमराम,जेष्ठ साहित्यिका उषाकिरण आत्राम आदींची उपस्थिती होती. यादरम्यान फ्रेम या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. या अधिवेशनात संस्थापक अध्यक्ष मनोहरराव सुने यांनी विविध ठराव मांडल्यानंतर ते पारीत करून शासन दरबारी व लोकप्रतिनीधींकडे पाठविण्यात आले. यावेळी रमेश थोरात, सदानंद बोरकर, प्रा. पंकज इटकेलवार, प्रा. विकास जोशी, परमानंद तिराणीक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तृतीत सत्राच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी (गडचिरोली), अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदीप जोशी, सचिव अशोक पवार, अशोक यावूल, प्रा.रवींद्र मेंढे, बाबाराव खडसे, बाळासाहेब सोरगीवकर, अभिमन्यू भगत, ॲड. किरण भुते, माणिकराव ठाकरे, रमाकांत मोरे केंद्रीय संपर्क प्रमुख (मध्यप्रदेश), प्रदेश सल्लागार अरुण कुलथे,प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, प्रदेश सचिव गोपाल सरनायक, प्रदेश कार्यालय प्रमुख मंगेश राजनकार , मनोज कामटे प्रदेश संघटक,महिला मंच प्रदेश अध्यक्षा प्राचार्य डॉ मंजुषा सागर, महिला मंच प्रदेश सरचिटणीस कांचन मुरके, प्रसिध्दी प्रमुख शहजाद खान आदींची उपस्थिती होती. यावेळी महिला मंचची कार्यकारीणी घोषीत करण्यात आली व सत्कार सोहळा सुध्दा पार पडला. चंद्रपुरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. सदर अधिवेशनाचे संयोजक रविंद्र तिराणीक होते. तत्पुर्वी ३ मे रोजी रात्री ७ वाजता नटश्रेष्ठ निळू फुले फाउंडेशन, अकोला प्रस्तुत ब्लॅक काॅमेडी एकपात्री ‘बकरी शेर खा गई‘ च्या प्रयोगाचे सादरीकरण दिग्दर्शक, लेखक डॉ. रमेश थोरात यांनी केले. तसेच परमानंद तिराणीक यांनी एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले. या अधिवेशनाला संपुर्ण महाराष्ट्रातील पत्रकार उपस्थित होते. अधिवेशनाच्या यशस्वीतेकरीता चंद्रपुर जिल्ह्यातील अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रज्ञा जिवनकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रविंद्र मेंढे व संयोजक रविंद्र तिराणीक यांनी केले.