श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम...वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के...
जळगाव जामोद प्रतिनिधी -
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील कला व वाणिज्य या दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कला शाखेच्या निकालाची टक्केवारी 83.33 आहे.वाणिज्य शाखेमध्ये 94 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 94 विद्यार्थी पास झालेत.त्यामध्ये बारा विद्यार्थी हे प्राविण्यश्रेणी तर 34 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत पास झालेत.कला शाखेमध्ये 90 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दोन विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत. दोन्ही शाखेतील पहिले तीन क्रमांक मिळवणारे विद्यार्थी असे- वाणिज्य शाखा :-प्रथम- कु.नेहा संजय शेगोकार - 508 (84.67%),द्वितीय - कु.कांचन महादेव हिस्सल - 494 (82.33%),तृतीय- कु.अस्मिता संतोष शिरसाट - 488 (81.33%),कला शाखा :-प्रथम - कु.माधुरी संतोष जुमळे - 496 (82.67%),
द्वितीय - कु.साक्षी दिगंबर हिस्सल - 455 (75.83%),तृतीय - कु.प्रणाली रामेश्वर भालतडक - 439 (73.17%).
जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल,सचिव अनुप पुराणिक,सहसचिव मिलिंद जोशी,संचालक गोविंदराव देशपांडे,ऍड.शशिकांत गुप्ता,अभिजीत कुलकर्णी,अविनाश कुलकर्णी अमरीश पुंडलिक,गायत्री विप्रदास यांनी या उत्कृष्ट निकालाबद्दल प्राचार्य डॉ.गिरीश मायी,अधीक्षक संजय गाडेकर,प्रा.डॉ.ऋषिकेश विप्रदास यांच्यासह पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखेडे,प्रा.राजीव देवकर प्रा.ऋषिकेश कांडलकर,प्रा.वसंत चव्हाण,प्रा.विनोद झोपे,प्रा.गणेश जोशी,प्रा.विनोद बावस्कर,प्रा.रामेश्वर सायखेडे,प्रा.नीलिमा भोपळे यांचे अभिनंदन केले.
