"मुख्यमंत्री शंभर दिवशीय सात कलमी कृती आराखडा कार्यक्रम"____जिल्ह्यातूंन जळगाव जामोद ठरली गुणवन्त पंचायत समिती.....


 "मुख्यमंत्री शंभर दिवशीय सात कलमी कृती आराखडा कार्यक्रम"____जिल्ह्यातूंन जळगाव जामोद ठरली गुणवन्त पंचायत समिती.....

जळगाव (जामोद):- दि.१४

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र शासन यांच्या संकल्पनेतुन कार्यालयिन सुधारणा मोहिम १०० दिवसीय ७ कलमी कृती आराखडा कार्यक्रम सम्पूर्ण राज्यात १ जानेवारी पासून सुरू केला, व प्रत्येक कार्यालयास याबाबत निर्देशित करण्यात आले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी सम्पूर्ण जिल्ह्यात हे अभियान  यशस्वीरीत्या राबवण्याचे काम सुरू जरून १३ ही पंचायत समिती ने यात कामकाज सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. यातच या उपक्रमातून स्पर्धा सुद्धा लावण्यात आली होती. यात बुलढाणा जिल्ह्यात हा कार्यक्रम यशस्वीरित्या सर्व  ७ कलमी कार्यक्रमात अग्रेसर राहण्यात जळगाव जामोद पंचायत समिती ने बहुमान मिळून जिल्ह्यातून गटविकास अधिकरी संदीपकुमार मोरे व त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी च्या प्रयत्न शंभर टक्के यश संपादन केले. जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान हा जळगाव जामोद पंचायत समितीला मिळाल्याने तालुक्याच्या लौकिकात एक मानाचा तुरा रोवला गेला.नुकतीच १ जानेवारीपासून संपूर्ण राज्यामध्ये सर्व कार्यालयांमध्ये कार्यालयीन सुधारणा मोहीम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शंभर दिवसीय सात कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उद्दिष्ट सर्व कार्यालयांना देण्यात आले होते. यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालय ,सर्व सर्व जिल्हा परिषद तसेच , तालुका पातळीवरील कार्यालये इतर सर्व कार्यालय यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. शासनाने ठरवून दिलेले निकषांमध्ये प्रत्येक निकषात बुलढाणा जिल्ह्यातील तेराही पंचायत समिती पैकी जळगाव जामोद पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे  व त्यांच्यासोबत असणारी त्यांची टीम यांनी या तीन महिन्यांमध्ये त्यांच्या कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलून नावलौकिक मिळवून ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यासाठी आपली आपुलकीची पंचायत समिती म्हणून सध्या तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवण्यास पात्र ठरली आहे. ४ महिन्यात पंचायत समितीचे रुपडे पालटले असून ग्रामीन भागातून येणार प्रत्येक ग्रामस्थ हा समाधानी असल्याचे दिसून येते.

_________________________________

कार्यालयामध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था, अभ्यागत महिला पुरुष यांचे साठी बैठक व्यवस्था, दिव्यांग बांधव साठी बैठक व्यवस्था,प्रत्येक विभाग सक्रिय, लाभार्थी साठी तात्काळ सुविधा म्हणून वाकी टॉकी इंटरकॉम सेवा, तसेच अंतर्गत कार्यालयीन सुधारणा करण्यात आल्या आहेत, प्रत्येक वेळी विविध उपक्रमाने चर्चेत असणारी पंचायत समिती असून तिला जिल्ह्यात बहुमान मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.आता विभाग स्तरावरील स्पर्धेत ही पंचायत समिती पात्र ठरल्याने नुकतेच विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त कवडे साहेब, गटशिक्षणाधिकारी वामन फंड साहेब यांनी भेट देऊन विविध बाबींची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.

_____________________________________________

 कार्यालयीन सुधारणा मोहीम तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तात्काळ सेवा देणे हे आमचे आद्य कर्तव्य असून मा.मुकाअ गुलाबराव खरात साहेब , अति मुकाअ मोहन साहेब व उपमुक अ पवार साहेब यांचे वेळोवेळी असणारे मार्गदर्शन व माझ्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची  साथ या मुळेच हे शक्य झाले

संदीप कुमार मोरे

गटविकास अधिकारी जळगाव (जामोद)

Previous Post Next Post