भाजप जिल्हाध्यक्षपदी सचिन बापू देशमुख यांची फेरनिवड...


 
भाजप जिल्हाध्यक्षपदी सचिन बापू देशमुख यांची फेरनिवड...

 जळगाव जामोद प्रतिनिधी:-

भाजपाच्या बुलढाणा जिल्हा संघटनेला नवे बळ देणारे युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले जळगाव जामोद येथील सचिन बापू देशमुख यांची खामगाव घाटाखालील भाजप जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सचिन बापू देशमुख हे बुलढाणा जिल्हा भाजप युवा मोर्चाचे दोन वेळा अध्यक्ष राहिले असून त्यांच्या कार्यकाळात युवा मोर्चाने उल्लेखनीय प्रगती केली. जिल्हाभरात त्यांनी भाजपाच्या शाखांचा विस्तार करत संघटनेला भक्कम पायावर उभे केले. पक्षाकडून दिले गेलेले कार्यक्रम व पक्ष देईल ती जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे राबवत जिल्हा कायमच अव्वल स्थानी ठेवला.त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून, विधानसभा मतदारसंघातही यश मिळवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली असू त्यांच्यात कार्यकाळात जिल्ह्याला मंत्रीपद सुद्धा मिळाले.हे त्यांच्या नेतृत्वगुणांचे प्रतीक मानले जात आहे. अत्यंत कमी वयात त्यांनी मिळवलेला हा मान गौरवास्पद ठरतो.सचिनबापू देशमुख यांची ओळख ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून, लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक सुद्धा आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे संघ आणि भाजपाच्या विचारधारेशी जोडलेले असून, त्यांचे वडिल स्व. पंजाबराव बापू देशमुख यांनीही भाजपाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.सचिनबापू देशमुख यांच्या फेरनिवडीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल, अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे. तर जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाल्याने कामगार मंत्री आकाश फुंडकर, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती व जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार माजी कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी सचिन देशमुख यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
Previous Post Next Post