दी.न्यू.ईरा कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.३९ टक्के....


 
दी.न्यू.ईरा कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९.३९ टक्के....

जळगाव जामोद प्रतिनिधी-  

ऑनलाईन पद्धतीने दि.५ मे च्या दुपारी इयत्ता बारावीच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये स्थानिक दी. न्यू.ईरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९.३९टक्के. तर कला शाखेचा निकाल ८७.८७ टक्के असा एकूण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५.०५ टक्के असून कॉफी मुक्त परीक्षेची परंपरा असलेले हे महाविद्यालय निकालात अव्वल ठरले आहे.दि.न्यू.इरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत इयत्ता बारावी ला १६५ विद्यार्थी प्रवेशित होते त्यापैकी १६४ विद्यार्थी परीक्षेस बसले व त्यामधून १६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ३ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत,३७ पहिल्या श्रेणीत तर ९५ विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत , २८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९९.३९ टक्के आहे.दि न्यू इरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेत इयत्ता बारावी ला ९९ विद्यार्थी प्रवेशित होते त्यापैकी ९९ विद्यार्थी परीक्षेस बसले व त्यामधून ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी ७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत,२७ पहिल्या श्रेणीत तर ४५ विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीत , ८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ८७.८७ टक्के आहे.यावेळी दि. न्यू‌. इरा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुळकर्णी, उपप्राचार्य शेख सलीम,पर्यवेक्षक ओंकाराव तायडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एस. एफ. पाटील व शिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.

Previous Post Next Post