चिखलदरा तालुक्यातील कुही गावाजवळ वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, तीन जखमी प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन...


 
चिखलदरा तालुक्यातील कुही गावाजवळ वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, तीन जखमी प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन...

राजु भास्करे अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

सोमवार 5 मे रोजी सायंकाळी सुमारे ५:१५ वाजता चिखलदरा तालुक्यातील कुही गावाच्या परिसरात भीषण घटना घड़ली.आपल्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेचा ठीनगीमुळे मृत्यु झाला,तर तीन अन्य जख्मी झाले.पावसाळ्यात वादळी वार्यासह विजेचा कड़कडात होत असतांना झाड़वर विजेचा हल्ला झाल्याने हि दुर्घटना घड़ली. अचानक आलेल्या दुर्घटनेत शेतात काम करत असलेल्या ४२ वर्षीय चुन्नीलाल गुठू सावलकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले रामलाल सोनाजी चतुर, रूपाय रामलाल चतुर, व नंदलाल चतुर हे देखील गंभीर जख्मी झाले आहे.जखमींना त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र हतरू येथे प्राथमिक उपचार करिता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) उपचारासाठी दाखल करण्यात आले. असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर पुढील तपासणी व उपचारांसाठी त्यांना अधिक सुविधायुक्त रुग्णालया चूर्णी येथे हलवण्यात आले आहे.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांची प्रकृती सध्या स्थिर आहे, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि क्षेत्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले. आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि अॅम्ब्युलन्स पथकाने तातडीने जखमींना प्राथमिक उपचार दिले. पावसामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण झाले, मात्र ग्रामस्थांच्या सहकार्याने बचावकार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.चिखलदरा तहसीलदार यांनी सांगितले की, वादळी वाऱ्यामुळे जंगलात वीज पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जखमींवर योग्य उपचार मिळावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) घेतली असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने मदतकार्यात पुढाकार घेतला आहे..

Previous Post Next Post